GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

माजी गृहराज्यमंत्री आमदार संजय बनसोडे " उदगीर - जळकोट भुषण " पुरस्काराने सन्मानित

माजी मंत्री आमदार संजय बनसोडे
" उदगीर - जळकोट भुषण " पुरस्काराने सन्मानित

रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठाण उदगीरच्या वतीने सन्मान

उदगीर : येथील रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठाणच्या वतीने माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी उदगीर - जळकोट मतदार
संघाचा कायापालट करुन मतदार संघात
विविध विकास योजना खेचुन आणुन कोरोना काळातही मतदार संघात विकासाची गंगा खेचुन आणली म्हणून रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठाण उदगीरच्या वतीने माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांना  ' उदगीर - जळकोट भुषण ' पुरस्काराने रंगकर्मीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

गेल्या ७ वर्षापासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या मान्यवरांचा सत्कार रंगकर्मीच्या वतीने करण्यात येतो. यावर्षी रघुकुल मंगल कार्यालयात आयोजीत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी कार्यसम्राट आमदार तथा माजी मंत्री संजय बनसोडे यांना उदगीर जळकोट भूषण या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास लातूरचे सहाय्यक कामगार आयुक्त मंगेश झोले तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजजी राजे भोसले, विशेष आकर्षण म्हणून तानाजी द वॉरियर्स फेम अभिनेते कैलास वाघमारे, नामदेव कदम,
सतीश उस्तुरे,  दत्ताजी पाटील, चित्रपट महामंडळाचे सदस्य दत्ताभाऊ जवळगे, सिद्धेश्वर पाटणे, आदी उपस्थित होते.

उदगीर मतदार संघाचा मागील अनेक वर्षाचा विकासाचा बॅकलॉग माजी राज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांनी भरून काढला व मतदारसंघात विकासाची गंगा आणली. मागील २ वर्षाच्या काळातही कोरोना सारख्या महामारीच्या काळातही आ.बनसोडे यांनी आपल्या मतदारसंघात तळ ठोकून होते व आपल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत होते. या कठीण काळातही शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून विविध विकास कामासाठी अठराशे ते दोन हजार कोटी रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध करून घेवुन मतदार संघाला प्रगतीपथावर घेवुन जात आहेत. महाराष्ट्रात मतदार संघाची नवी ओळख निर्माण केली व देशाच्या नकाशावर
 उदगीर शहराची एक साहित्यनगरी म्हणून नवी ओळख निर्माण केली. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी ते सतत धडपडत असतात. गोर गरीब व कष्टक-यांचे नेतृत्व ते करत आहेत. शहरात विविध समाजासाठी भवनची निर्मिती त्यामध्ये लिंगायत भवन, बौद्ध विहार, आण्णाभाऊ साठे सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन, शासकीय विश्रामगृह, प्रशासकीय इमारत, पंचायत समितीची इमारत, तहसीलची इमारत, मुस्लीम शादीखाना, पाण्यासाठी वाटरग्रीड योजना, तिरु बँरेजेस, जळकोट उदगीर शहरात महापुरूषांचे पुतळे, मतदार संघाला जोडणारे सर्व मुख्य रस्ते, शहरातील अंतर्गंत रस्त्यासह नागरिकांना विविध मूलभूत योजना आदीसह विविध विकासकामे केली असुन असे विकास काम करणारे लोकप्रतिनिधी मतदार संघाला भाग्याने मिळतो म्हणून आमदार संजय बनसोडे यांना   " उदगीर - जळकोट भुषण " पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. 

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. बिभीषण  मद्देवाड ,  सचिव प्रा.ज्योती मद्देवाड, उपाध्यक्ष सिद्धार्थ सूर्यवंशी, संदीप मद्दे, मारोती भोसले, नागनाथ गुट्टे,  अँड.विष्णु लांडगे,  प्रा.रामदास केदार, रसुल पठाण, लक्ष्मण बेंबडे, निता मोरे, अर्चना पाटील, प्रल्हाद येवरीकर, जहांगीर पटेल, विवेक होळसंबरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड महेश मळगे 
यांनी केले. सुत्रसंचालन रसुल पठाण यांनी केले तर आभार प्रा.बिभीषण मद्देवाड यांनी मानले. कार्यक्रमास  समाजातील प्रतिष्ठीत मंडळी व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments