GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

मातृभूमी महाविद्यालयास " पॉवर लिफ्टींग व बॉडी बिल्डींग " मध्ये सुवर्ण पदके

मातृभूमी महाविद्यालयास " पॉवर लिफ्टींग व बॉडी बिल्डींग " मध्ये सुवर्ण पदके

 उदगीर : येथील मातृभूमी महाविद्यालयास   “ पॉवर लिफ्टींग व बॉडी बिल्डींग "  क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक  मिळाल्याने व महाविद्यालयाच्या  विद्यार्थ्यांनी  विद्यापीठ स्तरांवरील  विविध क्रीडा स्पर्धेत पारितोषीके पटकाविल्याबद्दल मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश उस्तुरे यांच्या हस्ते प्रविण राठोड , विश्वजित कांबळे , अथर्व मरेवार यांचा सत्कार करण्यात आला.
       मातृभूमी महाविद्यालयातील विद्यार्थी  विश्वजित कांबळे यांनी  विद्यापीठाच्या  "ब " झोनच्या  पॉवर लिफ्टींग या खेळप्रकारात सुवर्ण पदक पटकाविले व अथर्व मरेवार यांनी   विद्यापिठाच्या "ब झोन" च्या झालेल्या बॉडी बिल्डींग  या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकाविले तसेच प्रविण राठोड यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या  फुटबॉल संघात निवड झाली. त्याबद्दल मातृभूमीच्यावतीने संस्थाध्यक्ष सतिश उस्तुरे व प्राचार्या उषा कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . 
 यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सतिश उस्तुरे म्हणाले की विद्यार्थ्यानी शिक्षणाबरोबरच खेळातही प्राविण्या प्राप्त  करुण स्व:तच्या नावा बरोबरच देशाचे नावलौकीक करावे . खेळामुळे  विद्यार्थ्यांमध्ये खिलाडू वृत्ती, सांघिकवृत्ती  सोबतच स्पर्धा जिंकण्याची वृत्ती व जिद्द निर्माण होत असते. हि वृत्ती जीवनात यश मिळवण्यासाठी महत्वाची आहे . तसेच खेळामुळे  शरीर सुदृढ रहाते. सुदृढ शरीरात  सुदृढ मन वास करते . त्यामुळे विद्यार्थ्यांनी विविध खेळ प्रकारात सहभागी व्हावे असे आवाहनही विद्यार्थ्यांना केले.
यावेळी प्रा.बिभीषण मद्देवाड ,प्रा. उस्ताद सय्यद ,प्रा.  रणजित मोरे ,प्रा. रुपाली कुलकर्णी  ,प्रा. धोंडीबा जोशी , नंदु बयास  , संतोष जोशी , आकाश राठोड , अन्वेष हिपळगावकर , प्रा .आशा पवार , प्रा. रेखा रणक्षेत्रे , प्रा. अश्विनी देशमुख , प्रा. रुपाली कुलकर्णी , उषा सताळकर , ओमकारे जगदीशा , मीरा पाटील , प्रा. राजेश चटलावार व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments