GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांचे जीवन समृध्द करण्यासाठी प्रयत्न करणार : माजी गृहराज्यमंत्री आमदार संजय बनसोडे

शेतकऱ्यांचे जीवन समृध्द करण्यासाठी प्रयत्न करणार : माजी गृहराज्यमंत्री आमदार संजय बनसोडे

गुमास्ता संघाच्या इमारतीचे भुमिपुजन 

उदगीर : जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी व कृषी उत्पन्न बाजार समिती हे नात अतूट असून आपल्याला जगण्यासाठी लागणारे अन्न धान्य हे बाजार समितीच्या माध्यमातून सर्वांकडे पोहचत असुन यामधील आडत व शेतकरी यांचा दुवा असलेला गुमास्ता बांधव आहे. त्यामुळे त्यांनाही सर्व सुख सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी बाजार समितीने त्यांच्यासाठी नुतन इमारत बांधकामासाठी जागा उपलब्ध करुन दिली ही अभिमानाची बाब आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या माझ्या शेतकऱ्यांचे जीवन समृध्द करण्यासाठी मी सदैव प्रयत्न करणार असल्याचे मत माजी गृहराज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.

ते उदयगीरी गुमास्ता संघाच्या इमारतीच्या भुमिपुजन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेश्वर निटुरे, बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, उपसभापती रामराव बिरादार, दाल मिल असोसिएशनचे अध्यक्ष सुदर्शन मुंडे, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, संचालक सुभाष धनुरे, गौतम पिंपरे, प्रा.श्याम डावळे, बाजार समितीचे  सचिव भगवान पाटील, बाबासाहेब काळे पाटील, व्यकंटराव पाटील आवलकोंडेकर, गुरूनाथ बिरादार, आडत असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी घोगरे, कैलास पाटील,
विजयकुमार चवळे, गुरुनाथ बिरादार, दत्ता घोगरे, आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ.बनसोडे यांनी, 
मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती म्हणून उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. मागील काळात आडत व्यापारी, गुमास्ता संघ, हमाल, मापाडी व येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विविध सुख - सुविधा पुरविल्या आहेत. सोमनाथपुर येथे मोठे गोडावुन बांधून शेतकऱ्यांच्या अन्न धान्य साठवण्याची सोय केली आहे.
भविष्यात गुमास्ता बांधवासाठी बाजार समितीच्या परिसरात इमारत बांधकाम होत आहे. त्यासाठी माझाही हातभार लागावा म्हणून इमारत बांधकामासाठी आमदार फंडातुन १० लक्ष रुपयाचा निधी यावेळी जाहीर करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, सभापती सिद्धेश्वर पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी अमोल राठी, सतीश मजकुरे,अप्पासाहेब पाटील, बालाजी पाटील रावणगावकर, विनायक बिरादार, जयवंत सावरें, मल्लीकार्जुन लंदवाड‌कर, धनाजी बिरादार, सतीश पाटील, प्रल्हाद देमगुंडे, सतिश मजकुरे, गुणवंतराव माने, नागनाथ गुणाले, गुणवंतराव माने, नागनाथ गुणाले, शिवा कवठाळे, माधव पाटील, औदुंबर येरनाळे कपील शिंगडे, प्रदीप कवठाळे, शेखर नागापल्ले, रमेश बिरादार, नामदेव पताळे, ज्ञानोबा कासले, दिगंबर गोटमुखले, बालाजी जाधव, शिवदास निलेवाड, संजय सुरनर, मधुकर बिरादार, प्रताप म्हेत्र,संग्राम भेदे, उमाकांत गव्हाणे, विकास बिरादार, हणमंत चोपडे, शिवकांत मुळे, संग्राम गवारे यांच्यासह व्यापारी, गुमास्ता, हमाल बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक गुमास्ता संघाचे
अध्यक्ष विनायक चाकुरे यांनी केले. सुत्रसंचालन व आभार उत्तम भालेराव
यांनी मानले.

Post a Comment

0 Comments