ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

संत साहित्याच्या अभ्यासातून शिवराय घडले. - प्रा.डाॅ. गणेश बेळंबे

संत साहित्याच्या अभ्यासातून शिवराय घडले. - प्रा.डाॅ. गणेश बेळंबे

उदगीर : छत्रपती शिवाजी महाराजांनी नीतीचे न्यायाचे स्वराज्य निर्माण केले. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीला संत साहित्याचा आधार आहे. संतांना अपेक्षित समतेचं  राज्य शिवरायांनी निर्माण केलं. संतांना समाजातील वाईट चाली रूढी परंपरा नष्ट करायच्या होत्या आणि एक भयमुक्त समाज निर्माण करायचा होता. म्हणून स्वराज्य स्थापन करत असताना शिवरायांनी अंधश्रद्धा बाळगली नाही. पंचांग पाहून त्यांनी लढाई केली नाही.शिवरायांनी अनेक लढाया अमावस्येच्या रात्री केल्या. सिंधूबंदी असतानाही शिवरायांनी समुद्रामध्ये आरमार उभं केलं. देव दगडात नाही माणसात आहे‌,  संतांचा हा विचार शिवरायांनी कृतीत आणला. शिवरायांना उपदेश करत असताना जिजाऊंनी संत विचारांचे संदर्भ  दिलेले पत्रव्यवहारात दिसतात. स्वराज्य उभे करत असताना शिवरायांनी जातीभेद धर्मभेद केला नाही. जो स्वराज्याचा शत्रू तो आपला शत्रू या न्यायाने शिवरायांनी स्वराज्य उभं केलं. मराठा सेवा संघ उदगीर आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 362 व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित व्याख्यानमालेत छत्रपती शिवराय आणि संत साहित्य या विषयावर प्रा. डॉ. गणेश बेळंबे यांनी आपले विचार मांडले. हा कार्यक्रम उदगीर पंचायत समिती सभापती शिवाजीराव मुळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर यांनी केले. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका लक्ष्मीताई चंद्रशेखर भोसले, मादलापूरचे सरपंच उदयसिंह मुंडकर, डाॅ. धनाजी कुमठेकर, मराठा सेवा संघ जिल्हा उपाध्यक्ष प्रा. विवेक सुकणे, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर पाटील,कृ.उ.बा.स.उदगीरचे संचालक संतोष बिरादार,  माजी नगरसेवक विजयकुमार चवळे, लोकमत टाइम्सचे जिल्हा प्रतिनिधी विनोद चव्हाण आदी उपस्थित होते.
   उद्घाटक बस्वराज पाटील नागराळकर यांनी मराठा सेवा संघाच्या वतीने उदगीर तालुक्यात घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांची स्तुती केली. लोककल्याणासाठी मराठा सेवा संघाचा विचार घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे अशी आशा त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय समारोप करताना शिवाजीराव मुळे म्हणाले की शिवशाहीत लोकशाही होती म्हणून रयतेला स्वराज्य आपले राज्य वाटत होते. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून समाजाला जोडणारे आणि समाज घडवणारे कार्यक्रम नियमित घेतले जातात याबद्दल त्यांनी मराठा सेवा संघ पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
  कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक भारत कुंड यांनी केले. जिजाऊ वंदना व प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रदीप ढगे यांनी केले. आभार मराठा सेवा संघाची जिल्हा संपर्क प्रमुख माधव हलगरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मराठा सेवा संघ उदगीरचे सचिव राजकुमार कानवटे, उपाध्यक्ष कालिदास बिरादार, प्रसिद्धीप्रमुख गणपत गादगे, कार्याध्यक्ष अंकुश हुंडेकर, कोषाध्यक्ष माधव जाधव, सहसंघटक उमाकांत सूर्यवंशी, दीपक मिरजकर, सहसचिव संदीप जाधव, वैजनाथ जाधव, ज्ञानेश्वर नकुरे संदीप नाईक आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post