उदगीर येथील पाच लेखकांच्या पुस्तकांचे मुंबईत प्रकाशन
उदगीर : वाचनसंस्कृतीचा वारसा जपण्यासाठी वाचू आनंदे या उपक्रमातर्गत अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड एज्युकेशन अँड कल्चरल ट्रस्ट आयोजित बालसाहित्यिका माजी विश्वकोश अध्यक्षा डॉ. विजया वाड यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त उदगीर येथील पाच लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन १८ जानेवारीला ३:३० वाजता मुंबई येथे महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या शुभ हस्ते आँनलाईन प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.
या प्रकाशन सोहळ्यात उदगीर येथील रामदास केदार यांचे कपाटातील पुस्तके या संस्कारक्षम बालकविता संग्रह, संजय ऐलवाड यांचे 'चिमणी पडली आजारी' ही मनोरंजनातून प्रबोधन करणारी बालककविता, स्मिता मेहकरकर यांचा पर्यावरण, संस्कार व उत्तम संस्कृतीवर आधारीत 'स्वच्छतेचे पाईक आम्ही' हा बालकविता संग्रह, अनिता यलमटे यांची संघर्षातून यशस्वी गरुडझेप घेऊ पाहणारी सुंदर कथा 'घे भरारी' हा कथा संग्रह, अंकुश सिंदगीकर यांचा बालकांची मने घडवणा-या उत्तर कथा 'हसरी फुलं' ह्या बालकथासंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. या प्रकाशन सोहळ्यास दै प्रहारचे संपादक सुकृत खांडेकर, कवी प्रविण दवणे, एकनाथ आव्हाड, माधवी कुटे, माधवी घारपुरे, पुनम राणे, मनीषा कदम, विश्वनाथ खंदारे उपस्थित राहणार आहेत.
0 Comments