GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

पुढची पिढी जगवण्यासाठी झाडे लावण्याची गरज - पर्यावरण मंत्री संजय बनसोडे

पुढची पिढी जगवण्यासाठी झाडे लावण्याची गरज - पर्यावरण मंत्री संजय बनसोडे

उदगीर : सद्या जमिनीच्या तापमानात वाढ होत आहे त्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडत चालले आहे, ऑक्सीजन मिळत नाही, त्यामुळे त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत आहे पुढची पिढी जगवायची असेल तर सर्वांनी झाडे लावावीत पर्यावरण संतुलित करावे असे आवाहन राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी देवणी तालुक्यातील नागराळ येथे आयोजित झेंड्या बरोबर झाडाला सलामी या कार्यक्रमा वेळी केले.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित झेंड्या बरोबर झाडाला सलामी हा उपक्रम हाती घेवून सुरू असलेल्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी सह्याद्री देवराई प्रमुख सिने अभिनेता सयाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बसवराज पाटील नागराळकर, उदगीर पंचायत समिती चे सभापती शिवाजीराव मुळे, रमेश अंबरखाने, मल्लिकार्जुन मानकरी, आदी उपस्थित होते.
  पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी सांगितले की, हे गाव सतत समाज सेवेसाठी तत्पर असते, सर्व गावकऱ्यांचे प्रचंड कार्य आहे, ज्या पद्धतीने पाणी फाऊंडेशन ची चळवळ निर्माण करून गावाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला त्याच पद्धतीने वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या गावाचा मोठा सहभाग आहे, सह्याद्री देवराई से प्रमुख सिने अभिनेता सयाजी शिंदे यांचे राज्यभर कार्य सुरू आहे त्यासाठी  मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून भविष्यात पाणी फाऊंडेशन सारखी  चळवळ उभी राहिल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
  यावेळी मान्यवरांच्या हस्ते गावातील ज्येष्ठ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून झाडाला सलामी देण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, वण विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments