GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

स्वखर्चातुन निडेबनकरांसाठी मोफत रुग्णवाहिका संदीप कोयले मित्रमंडळाचा स्तुत्य उपक्रम

स्वखर्चातुन निडेबनकरांसाठी मोफत रुग्णवाहिका

संदीप कोयले मित्रमंडळाचा स्तुत्य उपक्रम

उदगीर : येथील युवा सामाजिक कार्यकर्ते व
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष संदीप अशोकराव कोयले यांनी स्वखर्चातून निडेबन गावातील नागरिकांसाठी
मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करुन गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले आहे.
निडेबन गावासह परिसरातील 5 कि.मी. पर्यंतच्या रहिवाशांसाठी चालू केली असुन येत्या काळातही सर्व सामान्य जनतेच्या सेवेसाठी मी प्रयत्नशील असुन यापूर्वी ही पाणी टंचाईच्या काळात नागरिकांना मोफत पाणीपुरवठा, वृक्षारोपण, आरोग्य शिबीरासह संदीप कोयले मित्रमंडळाच्या वतीने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले आहेत. यापुढे सदैव जनतेच्या सेवेत मी उपलब्ध असल्याची प्रतिक्रिया युवा कार्यकर्ते तथा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप कोयले यांनी जनस्तंभ न्यूज नेटवर्कशी बोलताना दिली.
स्वातंत्र्य दिनी निडेबन ग्रामपंचायतीत सदर रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा 
निडेबन गावाच्या सरपंच श्रीमती जयश्री बेल्लाळे,  ग्रामपंचायत सदस्या विजया अशोकराव कोयले यांच्या हस्ते विधीवत पूजा करुन पार पडला.
लातूर जिल्ह्यातील व उदगीर तालुक्यातील निडेबन ही पहिली ग्रामपंचायत जिथे असावी ज्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी ग्रामस्थटंसाठी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली. 
या प्रसंगी ग्रामपंचायतचे उपसरपंच आत्तार फयाज अब्दुल रशीद , ग्रामसेवक शरद जाधव, इंजिनिअर हसूरे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष दशरथ शिंदे, सुनील सोमवंशी, पि डी पाटील,संदीप अनंतवाळ, श्रीकांत  जानते, फसी मणियार,सिराज शेख, ग्रामपंचायत सदस्य,ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments