उदगीर - नांदेड एस.टी आगारच्या बस सेवेचा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते शुभारंभ
जळकोट : उदगीर येथून कंधार जळकोट मार्ग नांदेड येथे एसटी बस सेवेचा शुभारंभ आज राज्याचे पर्यावरण पाणी पुरवठा राज्यमंत्री तथा उदगीर जळकोटचे आमदार ना.संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
उदगीर येथून कंधार - जळकोट मार्ग नांदेडसाठी एस.टी महामंडळाच्या गाड्या उपलब्ध नसल्याने येथील नागरिकांना अनेक समस्याला सामोरे जावे लागत होते. अनेक दिवसांपासून या मार्गाच्या गाड्या सुरु करण्यात यावेत अशी मागणी करण्यात येत होती. उदगीर आगारातुन अनुक्रमे सकाळी 6:30 व 7:30 वाजता या दोन्ही गाड्या सुटणार आहेत.
उदगीर, जळकोट परिसरातील नागरिकांची यामुळे सोय होणार आहे अनेक दिवसांपासून ही मागणी मान्य केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अर्जुन आगलावे, मन्मथ किडे ,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मारूती पांडे, विभागीय वाहतूक अधिकारी वाकोडे, जळकोट एसटी चे आगरप्रमुखकाततोडे इत्यादी उपस्थित होते.
0 Comments