GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

सा.बां. विभाग उदगीरच्या अधिकारी व कर्मचारी निवासस्थान बांधकामसाठी सुमारे 9 कोटी निधी मंजूर - राज्यमंत्री संजय बनसोडे

सा.बां. विभाग उदगीरच्या अधिकारी व कर्मचारी निवासस्थान बांधकामसाठी सुमारे  9 कोटी निधी मंजूर - राज्यमंत्री संजय बनसोडे

उदगीर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानाच्या  बांधकामासाठी शासनाने सुमारे 9 कोटीचा निधी मंजूर केला आहे अशी माहिती राज्याचे पर्यावरण पाणी पुरवठा राज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी दिली आहे
     उदगीर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता अधिकारी व कर्मचारी राहात असलेल्या घरांची दुरावस्था झाली होती. यामुळे या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची मोठी गैरसोय होत होती या ठिकाणी नवीन व सर्व सोई सुविधाने युक्त असे निवासस्थान असावे अशी मागणी प्रशासकीय स्तरावरुन करण्यात येत होती.
या मागणीला शासनाने हिरवा कंदील दाखविला असुन या घरासाठी शासनाने सुमारे नऊ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने अधिकारी व कर्मचारी यांचे 32 निवासस्थान उभे राहणार आहेत. आधुनिक सोई सुविधा सह, पर्यावरण पुरक असे हे निवासस्थान असणार आहे याची प्रशासकीय मान्यता झाली असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती राज्याचे पर्यावरण पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments