GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

दररोज २० किमी चालवून साजरा केला वर्ल्ड बाइसिकल डे

दररोज २० किमी चालवून साजरा केला वर्ल्ड बाइसिकल डे

प्रदूषण रोखण्यासाठी व निरोगी आरोग्यासाठी पेडल टू गो ग्रुपचा उपक्रम


उदगीर : दरवर्षी 3 जून रोजी आंतरराष्ट्रीय सायकल दिवस साजरा करण्यात येतो. हा दिवस सायकलची वैशिष्ट्ये आणि उपयुक्तता ओळखण्यासाठी तसेच त्याचा प्रसार करण्यासाठी साजरा केला जातो. शहरातील नागरिकांनी जवळचं अंतर पूर्ण करण्यासाठी सायकलींचा वापर केला तर दररोज शेकडो लिटर पेट्रोलचा वापर कमी होईल आणि शहरातील प्रदूषण पातळीही कमी होईल. सायकल चालवल्यामुळं सोशल डिस्टंसिंगचं देखील पालन होतं आणि ते सुरक्षित राहतात.उदगीर शहरात पेडल टू गो या ग्रुपने महिनाभर दररोज किमान २० किमी सायकल चालवून सायकल दिवस साजरा केला.यात राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक सुशीलकुमार पांचाळ, अमोल घुमाडे,राजीव जाधव,विवेक होळसंबरे,शेखर बोधले,विकास बन,गोविंद रंगवाळ,बालाजी हुनसनाळे,युवराज कांडगिरे,संदीप मद्दे यांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्राने 3 जून 2018 रोजी पहिला अधिकृत जागतिक सायकल दिवस (World Bicycle Day) साजरा केला होता.हा दिन साजरा करण्यामागचा उद्देश खरं तर, प्रत्येक व्यक्तीला पर्यावरणाप्रती त्यांची बांधिलकी समजून देऊन प्रदूषण कमी करण्यास त्यांना प्रवृत्त करणे हा आहे.
 सायकल वापराचे फायदे :
सायकलच्या वापराने हार्ट हेल्दी राहते, बॉडीमधील रक्त प्रवाह चांगला होती, ब्रेन पॉवर वाढते, फॅट कमी होतात, कॅन्सर आणि डायबेटीसचा धोका कमी होतो. सायकलिंग हा आरोग्यासाठी चांगला खेळसुद्धा आहे. कुठल्याही वयात आरोग्यदायी राहण्यासाठी सायकल अत्यंत उपयुक्त ठरते.सायकल वापराने स्ट्रोक्स, हार्ट प्रॉब्लेम्स, काही कॅन्सर, आणि डायबेटीसचा धोका कमी होतो. सायकलिंग हा चांगला खेळसुद्धा आहे आणि कुठल्याही वयात आरोग्यदायी राहण्यासाठी अत्यंत उपयुक्त म्हणून आरोग्य क्षेत्रात ओळखला जाणारा मार्ग आहे. सायकल हे अत्यंत निसर्गोपयोगी वाहन आहे. इतर वाहनांसारखे, सायकल कुठल्याही प्रदूषणास कारणीभूत ठरत नाही.अत्यंत कमी खर्चात सामान्य माणूस देखील या वाहनाचा वापर करू शकतो आणि त्यामुळेच सायकल हे वाहन लोकप्रिय ठरते.सायकल वापराने ध्वनी प्रदूषण आणि हवा प्रदूषण कमी करण्यास मदत होते.अशी माहिती पेडल टू गो ग्रुपचे ओम गांजुरे, डॉ.संजय कुलकर्णी, डॉ.धनाजी कुमठेकर यांनी दिली.

Post a Comment

0 Comments