गेल्या अनेक वर्षांपासूनची उदगीरकरांची लवकरच होणार स्वप्नपूर्ती - जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे
लिंबोटी येथे पम्पिंग स्टेशनचे जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते उद्धाटन
उदगीर : उदगीरकरांची गेल्या अनेक वर्षांची तहान भागवण्याचे काम उदगीर नगर परिषदेच्या अटल अमृत योजनेच्या माध्यमातून लवकरच पूर्ण होणार असून लिंबोटीचे पाणी उदगीरच्या दारात आले आहे.उदगीरकरांची स्वप्नपूर्ती होणार आहे असे जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी सांगितले.
उदगीर नगर परिषदेमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदगीरकरांची तहान आगामी पन्नास वर्ष भागू शकेल अशा अटल अमृत योजनेला मंजुरी दिली.
लिंबोटी धरणावरून उदगीर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अटल अमृत योजनेअंतर्गत काम सुरू आहे या योजनेअंतर्गत पंप हाऊसचे काम पूर्ण झाले असून पंपिंग मशिनरीचे बसवण्याची कामाची सुरुवात आज लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. एकूण १५०० एचपी 5 पंप लिंबोटी येथील धरणावर बसणार आहेत या पंपिंग मशिनरीचे तासी आठ लाख लिटर पाण्याची डिस्चार्ज आहे. या मशनरीच्या कामाचे शुभारंभ आज करण्यात आले. या प्रसंगी उदगीर नगर परिषदेचे अध्यक्ष बस्वराज बागबंदे उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, भाजपा उदगीर शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर, पाणीपुरवठा सभापती मनोज पुदाले, काँग्रेसचे गटनेते मंजूर खान पठाण, सय्यद ताहेर हुसेन, नियोजन सभापती अॅड. सावन पस्तापुरे, नगरसेवक राजकुमार भालेराव, गणेश गायकवाड, श्रीरंग कांबळे, रामेश्वर पवार,पप्पु गायकवाड, अनिल मुदाळे, राजु मुक्कावार, फैजुखान पठाण, साईनाथ चिमेगावे, आनंद बुंदे, अॅड दत्ताजी पाटील व महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाचे अभियंता नागरगोजे, नगरपरिषदेचे अभियंता सुनिल कटके, तेजस कन्स्ट्रक्शन चे प्रोजेक्ट मॅनेजर गणेश्रश पाटील, व्यंकटेश्वरा एजन्सीचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
0 Comments