GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

कोव्हीड-19 संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी

कोव्हीड-19 संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी

लातूर : जिल्ह्यात मागील काही दिवसांत कोविड-19 रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले बहुतांश निर्बंध हटविण्यात आले असून विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजनितीक व इतर कार्यक्रमात मोठया प्रमाणात गर्दी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखणेसाठी प्रतिबंधात्मक उपायोजना करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी ,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांनी नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हयात सार्वजनिक स्वरुपाचे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजनितिक ई. प्रकारचे कार्यक्रम आयोजनास 50 व्यक्तीसंख्येची मर्यादा निश्चित करीत असल्याचे आदेश जारी केले आहेत.
 सार्वजनिक स्वरुपाचे धार्मिक कार्यक्रमामध्ये रुढी परंपरेनुसार फक्त आवश्यक विधी पार पाडण्यात यावेत यामध्ये कमाल व्यक्तीसंख्येची मर्यादा 50 इतकी असेल, कोणत्याही परिस्थितीत   विहित  मर्यादेपेक्षा जास्त व्यक्तीसंख्या वाढणार नाही याची विशेष दक्षता घेण्यात यावी.
या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधिताविरुध्द साथरोग प्रतिबंधक कायदा, 1897 अन्वये दिलेल्या तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 तसेच महाराष्ट्र कोव्हीड-19 उपाययोजना नियम, 2020 च्या तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे ही आदेशात नमुद केले आहे.

Post a Comment

0 Comments