GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय लघुपट महोत्सवासाठी लघुपट पाठविण्याचे आवाहन २० फेब्रुवारीला होणार महोत्सव

राष्ट्रीय लघुपट महोत्सवासाठी लघुपट पाठविण्याचे आवाहन
  
२० फेब्रुवारीला होणार महोत्सव 



उदगीर : येथील रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठान उदगीर  वतीने मागील पाच वर्षा पासुन लघुपट महोत्सवाचे आयोजन केले जाते. पाचवे राष्ट्रीय लघुपट महोत्सवासाठी लघुपट महोत्सव शनिवार दि. २० फेब्रुवारी रोजी रघुकुल मंगल कार्यालय उदगीर येथे संपन्न होत आहे.   
     उदगीर लघुपट महोत्सव हा भारतातील ग्रामिण भागातील सर्वात मोठा महोत्सव असुन  दरवर्षी संपूर्ण भारतातून विविध भाषेतील  लघुपट दाखल होत असतात.  सर्वोत्कृष्ठ लघुपट प्रथम २१०००₹ ,द्वितीय ११०००₹ तसेच  सर्वोत्कृष्ट पूरुष अभिनय , स्त्री अभिनय , कथा व संवाद ,  दिग्दर्शन , संगीत  प्रत्येकी प्रथम ३०००₹ द्वितीय २०००₹ व प्रत्येकी गौरव चिन्ह व गौरवपत्र देत मान्यवरांच्या हस्ते गौरविले जाणार आहे. लघुपट दि. १५ फेब्रूवारी पर्यंत  lokaksharnews@gmail.com  या मेलवर पाठविण्याचे आवाहन संयोजक प्रा. बिभीषण मद्देवाड मो. 9823160552 पाठविण्याचे आवाहन अॅड  विष्णू लांडगे ,अॅड महेश मळगे , महादेव  खळूरे, प्रा. डाॅ. संग्राम गायकवाड  प्रा.प्रल्हाद येवरीकर, सचिन शिवशेट्टे , सिद्धार्थ सुर्यवंशी, जहांगीर पटेल , दत्तकुमार स्वामी , माधव रोडगे, बसवेश्वर डावळे , अनमोल कवडेकर आदींनी केले आहे.

Post a Comment

0 Comments