आय.पी.एस. हरेश्वर स्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर , वृक्षारोपण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
संवेदना फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम...
उदगीर : तालुक्यातील मौजे लोहारा येथील भूमिपुत्र आय.पी.एस. हरेश्वर स्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त संवेदना फाऊंडेशन, लोहाराच्या वतीने वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रथम संवेदना फाऊंडेशनच्या वतीने कार्यक्रमाच्या अध्यक्षा मातोश्री भागीरथीबाई स्वामी, उद्घाटक तथा लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष, राहुल भैय्या केंद्रे, प्रमुख पाहुणे व उदगीर पंचायत समिती सभापती शिवाजीराव मुळे, कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीरचे सभापती सिद्धेश्वर (मुन्ना) पाटील, जिल्हा परिषद सदस्य शंकर रोडगे, पंचायत समिती सदस्य सुभाष कांबळे, आदी उपस्थित होते.
त्यानंतर झालेल्या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी फाउंडेशनच्या वतीने १११ रोपट्यांचे वृक्षारोपणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष महेश्वर स्वामी, उपाध्यक्ष राजकुमार साकोळे, सचिव शिवकुमार खरोबे, सहसचिव मनोज बिरादार, कोषाध्यक्ष महेश मठचे, सदस्य तानाजी सामनगावे,प्रशांत सोनटक्के व फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवकांत चेरेकर यांनी केले. सूत्रसंचालन सौ. मनीषा पवार यांनी तर आभार संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष महेश्वर स्वामी यांनी मानले.
0 Comments