GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

मातृभूमीत 72 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा सामाजिक कार्यकर्ते किरण होळसंबरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

मातृभूमीत 72 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 


सामाजिक कार्यकर्ते किरण होळसंबरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

       उदगीर : येथील मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित मातृभूमी महाविद्यालय कस्तुराबाई नर्सिंग स्कूल मातृभूमी नर्सिंग स्कूल येथे  दिन प्रजासत्ताक वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षेसह ध्वजारोहण करण्यात आले.
       यावेळी मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश उस्तुरे यांच्या उपस्थितीत किरण होळसंबरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन व ध्वजारोहण करण्यात आले. यापुर्वी मातृभूमी महाविद्यालयात माजी सैनिक , शेतकरी , हैद्राबाद मुक्ती संग्रामातील सेनानी यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले होते. यावर्षी सामाजिक जानिवेतून विविध सामाजिक उपक्रमात सहभाग घेत गरीब व गरजूच्या मदतीला धावणारे किरण होळसंबरे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.  यावेळी प्रा. उस्ताद सय्यद, प्रा, एस.एस.सी कार्यक्रम अधिकारी प्रा.बिभीषण मद्देवाड, प्रा. किशोर हरणे, प्रा. रणजित मोरे, प्रा. मासूम शेख, प्रा. स्वाती खंडे, प्रा .रेखा नक्षत्रे, प्रा. मीना केंद्रे, दयानंद टाके, विवेक देवर्षे व मुबारक पटेल आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments