GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

उदगीरकरांना पर्यावरणाचा संदेश देत मुख्याधिकारी भारत राठोड यांची 'सायकलवारी'

उदगीरकरांना पर्यावरणाचा संदेश देत मुख्याधिकारी भारत राठोड यांची 'सायकलवारी'


   उदगीर : येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांनी उदगीर शहर वासियांना पर्यावरणाचा संदेश देत 'सायकलवारी' करत आहेत. शहरातुन चारचाकी वाहनाऎवजी सायकलवरुन विविध भागात जावून नागरिकांच्या समस्या समजून घेवुन ते सोडवण्याचा प्रयत्न ते सातत्याने करताना दिसतात. त्यातच कालच तळवेस येथील क्रिडांगणाची पाहणी करण्यासाठी नगर परिषदेची टिम घेवुन त्यांनी पाहणी केली व कर्मचा-यांना सूचनाही केल्या. यावेळी नगर परिषदेचे इतर कर्मचारी हे चारचाकी गाडीत अन् मुख्याधिकारी भारत राठोड हे सायकलवर पाहुन नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. मुख्याधिकारी निवासस्थान ते नगर परिषद व दिवसभरात कुठेही भेट द्यायची झाली तर ते सायकलवरुनच जावुन नागरिकांच्या अनेक समस्या सोडवत आहेत. स्वतःची चार चाकी गाडी असून देखील गरज असेल तेंव्हाच ती वापरत असून शहरातील बहुतांश ठिकाणी सध्या ते सायकलनेच फिरत आहेत.
   लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असलेल्या उदगीर शहरात आजपर्यंत अनेक मुख्याधिकारी आले आणि गेले पण सायकलवर जावुन नागरिकांमध्ये जनजागृती करणारे मुख्याधिकारी राठोड हे उदगीरचे पहिलेच मुख्याधिकारी असावेत. यावर्षी एप्रिल, मे, जुन ते आजपर्यंत कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णावर नगर परिषदेचे कर्मचारी सोबत घेवुन त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी राठोड यांनी पार पाडल्याने ते उदगीर शहरातील नागरिकांच्या मनात कायमच आहेत. 
उदगीर शहर हे मोठ्या बाजार पेठेचे शहर असून येथील रस्ते हे नेहमीच वर्दळीने भरलेले असतात. शहाराचा विस्तार हा दिवसेंदिवस वाढतच आहे. आठ दिवसापूर्वीच अतिक्रमणाची मोहिम राबवत मुख्याधिकारी भारत राठोड यांनी शहरातील बसस्थानकासमोरील अतिक्रमण काढून येथील सोसायटीचा रस्ता मोकळा केला आहे. 
सध्याच्या युगात प्रत्येकाकडे छोटे-मोठे वाहन असुन या वाहनामुळे प्रदूषण ही वाढत आहे.
वाढत्या प्रदूषणामुळे विविध आजार होत आहेत. याचाच एक भाग म्हणून सध्याच्या काळात सायकलची स्वारी ही आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असून तरूणांनी याकडे सायकलिंग करावे असा सल्लाही मुख्याधिकारी भारत राठोड यांनी अनेक तरूणांना दिल्याचे काही तरुण मंडळी बोलून दाखवतात.

Post a Comment

0 Comments