GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

लातूर शहर महानगरपालिका हद्दीत रात्री संचारबंदी

लातूर शहर महानगरपालिका हद्दीत रात्री संचारबंदी 


       लातूर : राज्यात कोविड -19च्या  प्रादुर्भाचा धोका कमी करण्याच्या व नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.कोविड-19 या संसर्गजन्य आजारास प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने राज्यातील महानगरपालिका हद्दीत रात्री 11-00 ते सकाळी 6-00 वाजपर्यंत संचारबंदी लागू करण्याण्यात आली आहे.  
 जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन  प्राधिकरणचे अध्यक्ष  पृथ्वीराज बी.पी यांनी दि.22 डिसेंबर 2020 ते 5 जानेवारी 2021 या कालावधीत लातूर शहर महानगरपालिाका,लातूर हद्दीत रात्री 11-00 ते सकाळी 6-00 वाजपर्यत संचारबंदी  लागू  करण्यात आली  असल्याचे  आदेश जारी केले आहेत.
 या आदेशात महाराष्ट्र शासन व जिल्हाधिकारी लातूर यांनी वेळोवेळी पारित केलेल्या आदेशान्वये देण्यात आलेल्या अत्यावश्यक/जीवनाश्यक सेवा तसेच वस्तू यांना सूट सवलत असेल.कोविड-19 प्रतिबंधात्मक  नियम शारिरिक अंतर, फेसमास्कचा वापर, वैयक्तिक स्वच्छता इत्यादी सावधगिरीच्या नियमांचा काटेकोरपणे पालन करण्यात यावे. या आदेशान्वये उल्लघन झाल्याचे निदर्शनास आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियमन-2005,साथरोग प्रतिबंधात्मक कायदा -1897 अन्वये दिलेल्या तरदुदीनुसार भारतीय दंड संहिता-1860 चे ककलम 188 नुसार तसेच महाराष्ट्र कोविड -19 उपयोनजना नियम-2020 च्या तरतुदीनुसार कर्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी,असेही आदेशात नमुद केले आहे.

Post a Comment

0 Comments