GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

जिल्हयातील 408 ग्रामपंचायतीच्यासार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर - जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज


जिल्हयातील 408 ग्रामपंचायतीच्या
सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर
               -जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज

जिल्हयात आदर्श आचार संहिता तात्काळ प्रभावाने लागू 


    लातूर : राज्य निवडणूक आयोग यांनी जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या लातूर जिल्हयातील 408 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूकीचा कार्यक्रम घोषीत केला आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याने संपूर्ण लातूर जिल्हयामध्ये आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार ग्रामपंचायत निवडणूका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणामध्ये होणे आवश्यक असल्याने राज्य निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता विषयक वेळोवेळी निर्गमीत केलेल्या आदेशांचे, निवडणुकांचे कार्यान्वयन करणेबाबत वेळोवेळी दिलेले आदेश व संदर्भीय निवडणूक कार्यक्रमाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांनी संबंधितांना दिल्या आहेत.
लातूर जिल्हयातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रि‍क निवडणुकांकरीता संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम पूढील प्रमाणे आहे. तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक 15 डिसेंबर 2020 (मंगळवार), नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी), दि. 23 डिसेंबर 2020 (बुधवार), ते 30 डिसेंबर 2020 (बुधवार) वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 3.00  (दिनांक 25, 26 व 27 डिसेंबर 2020 ची सार्वजनिक सुट्टी वगळून), नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी), दि. 31 डिसेंबर 2020 (गुरुवार) वेळ सकाळी 11.00 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत.  नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी),दि. 04 जानेवारी 2021 (सोमवार), दुपारी 3.00 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ दि. 04 जानेवारी 2021 (सोमवार), दुपारी 3.00 वा.नंतर, आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक दि. 15 जानेवारी 2021 (शुक्रवार), सकाळी 7.30 वा.पासून ते सायंकाळ 5.30 पर्यंत. मतमोजणीचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील.) दि. 18 जानेवारी 2021 (सोमवार) व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक 21 जानेवारी 2021 (गुरुवार), पर्यंत आहे.

Post a Comment

0 Comments