GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

ना.संजय बनसोडेंनी केले 10 रुग्णवाहिकेचे लोकार्पण रक्तदानासाठी युवकांचा उस्फुर्त सहभाग

ना.संजय बनसोडेंनी केले 10 रुग्णवाहिकेचे लोकार्पण
रक्तदानासाठी युवकांचा उस्फुर्त सहभाग


उदगीर : पद्मविभूषण खा.शरदचंद्रजी पवार यांच्या 80 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने उदगीर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन श्री छत्रपती शाहु महाराज सैनिकी स्कूल उदगीर येथे करण्यात आले होते.
उदगीर मतदार संघातील नागरिकांची गैरसोय दूर व्हावी म्हणून राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी 10 काॅर्डियाक रुग्णवाहिका आणुन त्या आपल्या मतदार संघातील जनतेच्या सेवेत आजपासुन दाखल केल्या आहेत. या रुग्णवाहिकेमुळे हजारो गोरगरीबांना याचा फायदा होणार आहे. या रुग्णवाहिकेमुळे येथील रूग्णांना नवसंजिवनी मिळणार आहे. येत्या काळात आपण उदगीर मतदार संघात नवनवीन योजना आणुन या मतदार संघाचा कायापालट करणार असल्याचे ना.बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर तालुक्यात महाविकास आघाडीच्या सर्व घटकांना सोबत घेवुन काम करणार असुन येत्या निवडणूकीत मित्र पक्षांना सोबत घेवुन या मतदार संघाचा विकास करणार असुन पुढील काळात सर्कलनुसार जनता दरबार भरवणार असल्याचे सांगितले. कार्यकर्तांनी पवार साहेबांचा आदर्श घेवुन समाजसेवेचे काम करावे. उदगीर मतदार संघातील विविध विकास कामे पुढील काळात करुन उदगीर शहराला माॅडेल शहर म्हणून नावारूपाला आणण्याची ग्वाही ही यावेळी ना.बनसोडे यांनी दिली.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, तालुकाध्यक्ष तथा पंचायत समितीचे सभापती प्रा.शिवाजी मुळे,कार्याध्यक्ष गजानन सताळकर, खरेदी विक्री संघाचे भरत चामले, शहराध्यक्ष समीर शेख, युवकचे तालुकाध्यक्ष रोहिदास कुंडगीर, मागासवर्गीय विभागाचे तालुकाध्यक्ष मुकेश भालेराव, ज्ञानेश्वर पाटील, महिला शहराध्यक्षा सौ.दिपाली औटे, डाॅ.भाग्यश्री घाळे, युवक शहराध्यक्ष अजय शेटकार, युवक कार्याध्यक्ष आझम पटेल, संघशक्ती बलांडे, फेरोज देशमुख, प्रवीण भोळे, अरविंद कांबळे, धनाजी बनसोडे, नवनाथ गायकवाड, प्रदीप जोंधळे, आजिम दायमी, शफी हाशमी, महेश बिरादार, राजीव वाघे, अतिक शेख, असलम शेख आदी उपस्थित होते.
उदगीर शहरात मागील काही दिवसापासून रक्ताचा तुटवडा जानवत होता. रक्ताची कमतरता असल्यामुळे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवकांनी रक्तदानासाठी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. या रक्तदान शिबीरात एकुण 211 रक्तदात्यांनी स्वेच्छा रक्तदान केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.गोपाळकृष्ण घोडके व प्रा.श्याम डावळे यांनी केले तर आभार महेश बिरादार यांनी मानले.
रक्त संकलनासाठी उदगीर येथील नागप्पा 
अंबरखाने ब्लड बँकेच्या वतीने रमेश अंबरखाने यांच्या मार्गदर्शनाखाली ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments