८ फेब्रुवारी रोजी उदगीरात लोकसंस्कृती साहित्य संमेलन
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ व रंगकर्मी प्रतिष्ठानचा पुढाकार
उदगीर : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई व रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान, उदगीर यांच्या वतीने उदगीरात दि. ८ फेब्रुवारी २०२५ शनिवार रोजी उदगीरात लोकसंस्कृती साहित्य संमेलन घेण्यात येणार असल्याची माहिती मराठवाडा साहित्य परिषद, छ. संभाजीनगर चे उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके व
रंगकर्मीचे अध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देवाड यांनी माहिती दिली.
उदगीर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजी महाविद्यालय परिसरात एक दिवशीय लोकसंस्कृती साहित्य संमेलन पार पडणार आहे.
या संमेलनात सकाळी ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, कविसंमेलन, कथा-कथन, परिसंवाद, पुरस्कार वितरण व सायंकाळी महाराष्ट्राची लोककला या संस्कृतिक कार्यक्रमाची रसिक श्रोत्यांना मेजवानी मिळणार आहे. या लोकसंस्कृती साहित्य समेंलनात महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक, कवी, कथाकार व चित्रपट क्षेत्रातील कलावंत उपस्थित राहणार आहेत. तेंव्हा या संमेलनाचा आनंद घेण्यासाठी उदगीर परिसरातील साहित्यिक, कलावंत व रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळ व रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने प्रा. बिभीषण मद्देवाड, मसाप चे केंद्रीय उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके, सचिव प्रा. ज्योती मद्देवाड, दादाराव दाडगे ,अॅड महेश मळगे, रसुल पठाण, रविंद्र हासरगुंडे, रामदास केदार, लक्ष्मण बेंबडे, मारोती भोसले, महादेव खळूरे, सिद्घार्थ सुर्यवंशी, सचिन शिवशेट्टे, प्रल्हाद येवरीकर, जहाँगीर पटेल, निता मोरे, ज्ञानेश्वर बडगे, विवेक होळसंबरे, सुनिल हावा , श्रीनिवास सोनी,अर्जुन जाधव , विक्रम हालकीकर ,टी. डी. पांचाळ, बालाजी भोसले, अर्चना पाटील, हणमंत केंद्रे, नागनाथ गुट्टे आदीनी केले आहे.
0 Comments