GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना क्रीडा व युवक कल्याण मंत्री बनसोडे साहेबाकडून गणवेश वितरण

गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना क्रीडा व युवक कल्याण मंत्री बनसोडे साहेबाकडून गणवेश वितरण
   उदगीर : लालबहादुर शास्त्री मा.विद्यालयातील सहशिक्षिका अनिता यलमटे यांनी सुरू केलेल्या  गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक दत्तक पालक योजनेतंर्गत गणवेश खरेदीसाठी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री संजयजी बनसोडे साहेबांनी दहा हजार रूपयांचे योगदान दिले.
      या निधीतून विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले.
 तसेच मागील दोन वर्षापासून डॉ .संदीप सोनटक्के यांनी दहावीच्या गरजू व होतकरू अशा दोन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारले आहे  तर हूजूर कलेक्शन चे संचालक प्रेम राजपाल यांनी गरजूंना गणवेश दिले  व इंजिनीयर विश्वजीत गायकवाड फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे 300  गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना  शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
    याप्रसंगी संकुलाचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार , कार्यवाह शंकरराव लासुणे ,मुख्याध्यापक अनंतराम कोपले ,उपमुख्याध्यापक अरुण पत्की ,पर्यवेक्षक कृष्णा मारावार, किरण नेमट , माधव मठवाले,अनिता यलमटे  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments