मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप
उदगीर : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उदगीर येथील सामान्य रुग्णालयातील रुग्णांना उदगीर येथील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप फळे करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख गोपाळ माने व जिल्हा संघटक अॅड श्री गुलाब पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
यावेळी लातूरचे उपजिल्हा प्रमुख विकास जाधव, जिल्हा संघटिका अँड पूजा कप्पीकेरे ,शिवसेना तालुकाप्रमुख
मनोज चिखले, शिवसेना महिला तालुका संघटक जनाबाई राठोड आदी उपस्थित होते.
या फळ वाटप कार्यक्रमाचे आयोजक शहर प्रमुख देवेंद्र कांबळे, शहर संघटक विक्रम आर्य , उपशहर प्रमुख रोहित बोईनवाड यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी शाखाप्रमुख प्रशांत घोलप, उपशाखा प्रमुख, राज सकट, शाखा संघटक सुनील कसबे, बालाजी गायकवाड यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शिवसैनिक उपस्थित होते.
0 Comments