GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

शिवाजी महाविद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा

शिवाजी महाविद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा

उदगीर : शिवाजी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. रामकिशन मांजरे होते. सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्र.प्राचार्य मांजरे यांनी आपल्या मनोगतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वांगीण कार्यावर प्रकाश टाकला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, लेखक,विचारवंत, खातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या तत्त्वाचा पुरस्कार 'शिका संघटित व्हा, संघर्ष करा' हा मूलमंत्र देऊन दीन,दुबळ्या लोकांच्या जीवनात त्यांनी क्रांती निर्माण केली असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार जयंती समितीचे प्रमुख प्रा. डॉ. सुरेश शिंदे यांनी केले.यावेळी प्रा.आनंद पाटील, महेश बिरादार, प्रा. एम. के. मोरे प्रा. राहुल कांबळे, प्रा. एस. एम. कोनाळे, प्रा. व्ही. के. भालेराव,प्रा.एम.एन.शेख, डॉ.एस.डी.सावंत, अधीक्षक व्ही.डी.गुरनाळे, आर.एम.लाडके,सौ शेडोळे,सौ. देवनाळे,  कमलाकर जगताप, सूर्यकांत गुंगेवाड,प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments