सर्वसामान्यांच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील : माजी मंत्री आ.संजय बनसोडे
महायुती सरकार हे आपला विकास करण्यासाठी कटीबध्द
उदगीर : मागील ५ वर्षात उदगीर मतदार संघाचा कायापालट केला असुन त्यासाठीच या भागातील माय - बाप जनतेने मला दुसऱ्यांदा आमदार होण्याची संधी देवून मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. आपल्या विश्वासाला तडा न जावु देता मी अविरतपणे काम करणार असून सर्वसामान्यांच्या विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील असल्याचे मत माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी केले.
ते उदगीर तालुक्यातील तोंडार येथील गुरु लिंगप्पा यांचा पुण्यस्मरण कार्यक्रम व सभामंडप कार्यक्रमाच्या उद्धाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी डाॅ.शंभुलिंग शिवाचार्य महाराज, उध्दव महाराज हैबतपुरे, शिवराज नावंदे गुरुजी, रामचंद्र तिरुके, बालाजी भोसले, राजेंद्र पाटील, श्याम डावळे, बाळासाहेब मरलापल्ले, सरपंच भरत कोचडवाड, कुशाल खिंडे, मल्लिकार्जुन बिरादार,प्रभाकर दाजी, रामलिंग कोरे, निलप्पा बिरादार, नीळकंठ बिरादार, ब्रम्हानंद पांडे, दादा पांडे, गुणवंतराव पटवारी, माधव पाटील, सुभाष रेगुडे, दशरथ पांडे ,प्रल्हाद पाटील, मनमत सांगवे, आनंदराव मालोदे, राजकुमार लिंबाळे, शिलाताई मालोदे, शिलाताई बिरादार, भारतबाई दाजी आदी उपस्थित होते.
यावेळी तोंडार येथील गुरु लिंगप्पा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आ.संजय बनसोडे यांनी अभिवादन करुन सभामंडप कार्यक्रमाचे उद्धाटन करण्यात आले.
पुढे बोलताना माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुती सरकारने राबवून महाराष्ट्रातील करोडो माता-भगिनींना या योजनेचा लाभ दिला. आता लवकरच लाडक्या बहिणींना मागील महिन्यांचे पैसे मिळणार आहेत. त्याचबरोबर शेतक-यांसाठी मोफत वीज देणार असुन या विधानसभेत महायुती सरकारला मिळालेले यश हे सर्वसामान्यांचे यश असुन महायुती सरकार हे
आपला विकास करण्यासाठी कटीबध्द असल्याचे ना.संजय बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी तोंडार व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
************
0 Comments