महाडिबीटी पोर्टल वर नवीन
शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी आवाहन
लातूर : जिल्हयातील सर्व शासनमान्य मान्यताप्राप्त अनुदानित/ कायम विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य व या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती ,इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी यांनी सन 2019-20 साठी Re-apply करण्यासाठी व सन 2020-21 या वर्षासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती (GOI) व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क (FREESHIP) राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठयक्रमांशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता मंजूर योजनेचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी हे पोर्टल दि. 3 डिसेंबर 2020 पासून सुरु करण्यात आलेली आहे.
जिल्हयातील सर्व प्राचार्य,कर्मचारी व विद्यार्थी यांनी शिष्यवृत्ती चे अर्ज अचूक भरुन मंजूरीसाठी या कार्यालयास विहीत वेळेत ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण लातूर यांनी केले आहे.
0 Comments