रंगकर्मी प्रतिष्ठानचे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहिर
'चला कवितेच्या बनात' साहित्य चळवळ, यशवंत विद्यालय अहमदपूर समर्थ विद्यालय एकुरका रोड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावणगाव या शाळांना आदर्श व उपक्रमशील शाळांचा पुरस्कार
२८ जानेवारीला होणार मान्यवरांच्या हस्ते वितरण
उदगीर : रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक ,शैक्षणिक ,कला ,साहित्य ,क्रीडा ,कृषी क्षेत्रात भरीव कार्य करणार्या मान्यवरांना दिला जाणारा मानाचा पुरस्कार रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देवाड यांनी जाहिर केले. या पुरस्काराचे वितरण रविवार दि.२८ जानेवारी २०२४ रोजी शिवाजी महाविद्यालय उदगीर येथे संपन्न होणार आहे.
मोतीअण्णा डोईजोडे ,उदगीर यांचा विशैष कार्यगौरव , प्रसिद्ध साहित्यिक भारत सातपुते यांच्या 'शिकाळं' या कथासंग्रहास , प्रसिद्ध कथाकार डाॅ.भास्कर बडे यांना 'ग्रंथालय चळवळ' , कवी प्रा .ललित आधाने संभाजीनगर यांच्या 'माही गोधडी 56 भोकी' या कवितासंग्रहास देवेन टाकळकर यांच्या 'कोरोना ' या संग्रास साहित्य क्षेत्राचा पुरस्कार , प्रसिद्ध नाट्य लेखक व ' ग्लोबल आडगाव' चित्रपटाचे दिग्दर्शक अनिलकुमार साळवे संभाजीनगर, प्रा.संगीता बागडे, उदगीर नाटय व मालिका कलावंत गोविंद मरशिवनीकर , मुंबई यांना कला क्षेत्रातील कार्याबद्दल, कर्जत जिल्हा रायगड येथील गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड दादाराव दाडगे उदगीर, सचिन दरेकर पोलादपूर रायगड, शशिकांत चापेकर यवतमाळ शेख- हिसामुद्दीन जैनुलाबोद्दीन उदगीर , दिलीप हणमंते उदगीर, प्राचार्य सूर्यकांत चवळे अहमदपूर, कल्पना चौधरी उदगीर, सौ. जयश्री भरडे /सोनटक्के मुखेड ,जयश्री पवार राठोड संभाजीनगर , सावित्री प्रभाकर घाटगे उदगीर, कामाक्षी कल्याणराव पवार, अहमदपूर ,वर्षा राठोड उदगीर , शाहू दशरथ केंद्रे उमरखेड यवतमाळ, शशिकांत चापेकर यवतमाळ, ज्ञानेश्वर बडगे उदगीर, प्रा. बाबुळसरे बी. एस. उदगीर, सुधाकर दरकू कवडे उमरखेड, कानेगावे राजेंद्र दत्तात्र्य निलंगा, सुशिलकुमार विजयकुमार मालवी वाशिम, विठ्ठल हणमंतराव मुंढे , जळकोट यांना शिक्षणक्षेत्रातील पुरस्कार तर सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल पुरस्कार बळीराम नामवाड जळकोट, मेघराज गायकवाड अहमदपूर यांना पुरस्कार जाहीर झाला आहे तर उदगीर येथील चंद्रकांत जाधव यांना कृषी व पर्यावरणाबद्दल आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे तसेच "चला कवितेच्या बनात " साहित्य
चळवळ उदगीर,यशवंत विद्यालय अहमदपूर समर्थ विद्यालय एकुर्का रोड ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावणगाव या शाळांना आदर्श व उपक्रमशील शाळां पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
रंगकर्मी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन, लघुपट निर्मिती शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य क्षेत्रात अविरतपणे कार्य करत आहे. विद्यार्थ्यांना व्यासपीठ देण्यासाठी रंगकर्मीच्या वतीने राज्यस्तरीय भव्य रंगभरण, चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन , विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा यासाठी विज्ञान प्रदर्शन पथनाटयातून पर्यावरण जनजागृती, व्यसनमुक्ती तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरींकापर्यत पोहचविण्याचे कार्य चालू आहे.
पुरस्कारमुर्तीचे अभिनंदन , रंगकर्मीचे अध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देवाड ,सचिव प्रा ज्योती मद्देवाड, राज्य समन्वयक अॅड विष्णू लांडगे ,अॅड महेश मळगे ,उपाध्यक्ष सिद्घार्थ सुर्यवंशी, मारोती भोसले, संदीप मद्दे ,रसुल दा पठाण, प्रा.रामदास केदार, लक्ष्मण बेंबडे , महादेव खळूरे , सचिन शिवशेट्टे , प्रल्हाद येवरीकर, जहाँगीर पटेल , निता मोरे, ज्ञानेश्वर बडगे , विवेक होळसंबरे, टी. डी. पांचाळ , बालाजी भोसले , अर्चना पाटील , हणमंत केंद्रे ,नागनाथ गुट्टे, विशाल आदेप्पा आदींनी केले आहे.
0 Comments