'विद्या विजय' सेवाभावी संस्थेच्या वतीने गुणवंताचा सत्कार
संस्थेच्या अध्यक्षा अॅड.वर्षाताई कांबळे यांचा स्तुत्य उपक्रम
उदगीर : येथील 'विद्या विजय सेवाभावी' संस्था, गांधीनगरच्या वतीने भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नामविस्तार दिनाचे औचित्य साधून गांधीनगर येथील अमर नरसिंगराव सोनकांबळे यांची 'सीबीआय क्राईम ब्रंच बेंगलोर ' येथे निवड झाल्याबद्दल
त्यांचा सत्कार संस्थेच्या अध्यक्षा अॅड. वर्षाताई पंकज कांबळे,राजेश गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी उदगीरचे तलाठी पंकज कांबळे,भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटोदे,जगन्नाथ बेलदार, मुन्ना पिंपरे, भारत कदम, सद्दाम बागवान आदी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना अॅड.वर्षा कांबळे यांनी, समाजातील गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी विद्या विजय सेवाभावी' संस्थेची स्थापना करण्यात आली असुन भविष्यात सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी व समाजातील शेवटच्या घटकातील गोरगरीब विद्यार्थ्यांकरिता काम करणार असल्याचे सांगितले.
यावेळी गांधीनगर येथील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होत.
0 Comments