मराठवाडास्तरीय लालबहादूर शास्त्री आंतरशालेय वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन
विविध गटातून 90 हजार रुपयांची भरघोस पारितोषिके
उदगीर : येथील लालबहादूर शास्त्री शैक्षणिक संकुलात मागील 43 वर्षापासून अखंडपणे लालबहादूर शास्त्रीजींच्या स्मरणार्थ मराठवाडास्तरीय आंतरशालेय वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन केले जाते.
या ऐतिहासिक व सुप्रसिद्ध स्पर्धेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय सदस्य तथा संकूलाचे कार्यवाह शंकरराव लासूणे ,मुख्याध्यापक अंबादास गायकवाड, उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी ,पर्यवेक्षक कृष्णा मारावार ,लालासाहेब गुळभिले ,माधव मठवाले,स्पर्धा प्रमुख सचिन यतोंडे, सहप्रमुख एकनाथ राऊत ,कार्यालयीन प्रमुख अशोक धायगुडे,प्रसिद्धी प्रमुख अनिता यलमटे ,गुरूदत्त महामुनी,संतोष कोले,मनोज भंडे यांच्या शुभहस्ते सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावर्षी ही स्पर्धा दि.18 व 19 जानेवारी 2023 रोजी आॕफलाईन संपन्न होईल. विविध गटातून सुमारे 90 हजार रूपयांची भव्य पारितोषिके वितरीत करणारी ही मराठवाड्यातील एकमेव ऐतिहासिक स्पर्धा आहे. ही स्पर्धा इयत्ता 8वी ते 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी असून प्रत्येक शाळेने एक संघ सहभागी करावयाचा आहे.या स्पर्धेत एका स्पर्धकांने विषयाच्या अनुकूल बाजूने व दुसऱ्या स्पर्धकाने विषयाच्या प्रतिकूल बाजूने विषय मांडणी करणे बंधनकारक आहे.या स्पर्धेचा यावर्षीचा विषय- 'शिक्षणाचे खासगीकरण समाजास तारक / मारक' असा आहे. मराठवाड्यातील शाळांनी या सुप्रसिद्ध स्पर्धेत सहभागी व्हावे , असे आवाहन संकुलाचे अध्यक्ष मधुकर वट्टमवार,तसेच कार्यवाह शंकरराव लासूणे, माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष सतनप्पा हुरदळे,मुख्याध्यापक अंबादास गायकवाड ,अंकूश मिरगुडे, श्रीपाद सीमंतकर यांनी केले आहे.
0 Comments