ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

लोणी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

लोणी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

उदगीर - उदगीर तालुक्यातील लोणी येथे लोणी प्रिमियर लीग, सिझन- २ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिध्देश्वर ऊर्फ मुन्ना पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
          दरवर्षी मोठ्या उत्साहात खेळवला जाणारा लोणी प्रिमियर लीग सिझन-२ क्रिकेट स्पर्धेमध्ये यंदा एकुण आठ संघ सहभागी झाले आहेत. प्रथम पारितोषिक ३१०००/- रू रोख रक्कम व सन्मान चिन्ह सभापती सिध्देश्वर ऊर्फ मुन्ना पाटील यांच्या तर्फे देण्यात येणार आहे.व तसेच द्वितीय पारितोषिक २१०००/- रू रोख रक्कम व सन्मान चिन्ह लोणी ग्रामपंचायत कार्यालय व तिसरे पारितोषिक ११०००/- रु रोख रक्कम व सन्मान चिन्ह युवा नेते योगेश उदगीरकर यांच्या वतीने देण्यात येणार आहे.  मागील दोन वर्ष कोविड मुळे या  स्पर्धा झाल्या नव्हत्या. पण यंदा खेळाडू आणि क्रिकेट रसिकांचा उत्साह पाहण्यासारखा आहे.
या स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजक करत आहेत.  
          यावेळी युवा नेते योगेशभैय्या उदगीरकर,सरपंच यमुनाजी भुजबळे, उपसरपंच वैजनाथ बिरादार, ग्रामपंचायत सदस्य शिवकांत मुळे, दयानंद पटवारी, जावेद शेख, अशोक मदनुरे, अमोल पटवारी, नितीन वाघमारे इ.मान्यवर उपस्थित होते. 
               या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजक म्हणून श्रीराम मुळे, सचिन वाघमारे, महादेव फड, लक्ष्मण भुजबळे इत्यादी क्रिकेट प्रेमी परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post