ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

उदगीर व जळकोट तालुक्यातील 460 हेक्टर क्षेत्र कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे सिंचनाखाली येणार - पर्यावरण व पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे

उदगीर व जळकोट तालुक्यातील 460 हेक्टर क्षेत्र कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे सिंचनाखाली येणार - पर्यावरण व पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे



उदगीर :  उदगीर व जळकोट तालुक्यातील जलसंधारणाच्या कामासाठी शासनाने 26.29 कोटी रक्कम मंजूर केली होती. याच अनुषंगाने आज खेर्डा व डाऊळ येथे प्रातिनिधीक स्वरुपात कोल्हापुरी बंधाऱ्याच्या बांधकामाचा शुभारंभ राज्याचे पर्यावरण व पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे नेते बसवराज पाटील नागराळकर, तहसिलदार रामेश्वर गोरे, कल्याण पाटील, शाम डावळे, उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले,ताहेर सय्यद, कार्यकारी अभियंता अनिल कांबळे इत्यादी उपस्थित होते.
उदगीर व जळकोट तालुक्यातील जलसिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी व वाहते पाणी थांबविण्यासाठी व शेतीचे क्षेत्र जास्तीत जास्त ओलिताखाली आणण्यासाठी शासनाच्या जलसंधारण विभागाने सुमारे 26.29 कोटी रक्कम मंजूर केली होती. त्या अनुषंगाने आज कोल्हापुरी बंधाऱ्याच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आले.
यात उदगीर व जळकोट तालुक्यात पाणीसाठी व सिंचन क्षेत्रात वाढ होण्याच्या दृष्टीने मृद व जलसंधारण महामंडळ, औरंगाबाद यांच्या मार्फत उदगीर तालुक्यात पिंप्री को.प.बं. रु. 1.21 कोटी, चांदेंगाव को.प.बं. रु. 1.44 कोटी, अवलकोंडा को.प.बं. रु. 1.18 कोटी, बनशेळकी को.प.बं. रु. 1.02 कोटी, वाढोणा को.प.बं. रु. 1.06 कोटी, डांगेवाडी को.प.बं. रु. 1.39 कोटी, मुत्तलगाव को.प.बं. रु. 1.03 कोटी, मोरतळवाडी को.प.बं.-2 रु. 1.41 कोटी, चांदेगाव को.प.बं.-1 रु. 1.44 कोटी, चांदेगाव को.प.बं.-2 रु. 1.44 कोटी, चौंडी को.प.बं.-3 रु. 1.14 कोटी, डाऊळ को.प.बं.-1 रु. 1.23 कोटी, डाऊळ को.प.बं.-2 रु. 1.15 कोटी, खेर्डा को.प.बं.-1 रु. 1.01 कोटी, खेर्डा को.प.बं.-2 रु. 1.12 कोटी, नळगीर को.प.बं.-2 रु. 1.11 कोटी व मल्लापुर सि.ना.बं. क्र-1,2,3 रु. 0.37 कोटी असे एकुण रु. 21.03 कोटी रक्कमेस प्रशासकिय मान्यता दिली आहे. या को.प.बंधाऱ्यामुळे 1392 सघमी पाणीसाठी निर्माण होणार असून यामुळे 359 हे. सिंचन क्षेत्र निर्माण होणार आहे.
तसेच जळकोट तालुक्यातील जळकोट को.प.बं.-1 रु. 1.43 कोटी, डोंगरकोनाळी को.प.बं.-1 रु. 1.33 कोटी, उमरगा रेतु को.प.बं.-1, रु. 1.26 कोटी, जळकोट-घोणसी को.प.बं.-2, रु. 1.24 कोटी असे एकुण 5.26 कोटी रक्कमेस प्रशासकिय मान्यता दिली आहे. या को.प.बंधाऱ्यामुळे 381 सघमी पाणीसाठा निर्माण होणार असून 101 हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण होणार आहे.
या कामास जलसंधारण महामंडळ, औरंगाबाद यांना सन 2021 मध्ये प्रशासकिय मान्यता देऊन निवीदा काढुन कार्यारंभ आदेश ही दिलेले होते. परंतु कोव्हिड-19 मुळे या को.प.बं. ची कामे गतवर्षी करता आली नसल्याने या कामास शासनाने स्थगिती दिली होती.
आता या कामाची शासनाने स्थगिती उठवुन निधी उपलब्ध करुन दिला असून या वर्षी वरील सर्व कामे पूर्ण  करण्याच्या सुचना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी डाऊळ-खेर्डा येथील कामाचा शुभारंभ करताना दिल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post