विकसित भारतासाठी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करा : क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे
भाजपा ४०० पार झाली तर प्रत्येक गावा - गावात विकासाची गंगा येणार
विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान कोणीच बदलु शकणार नाही
उदगीर : मागील १० वर्षात आपल्या देशाची प्रगती ही अतिशय वेगाने झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकास झाला. मोठ्या शहरात मेट्रो तर लहान मोठ्या शहरातुन राष्ट्रीय महामार्ग हे मागील १० वर्षाच्या काळात झाले. मागच्या काळात सर्व जाती धर्माला सोबत घेवुन नरेंद्र मोदींनी विकास केला. यापुढे ही विकासाची गंगा अखंडपणे शेवटच्या माणसापर्यंत घेवुन जावून आपल्या देशाला विकसित भारत करण्यासाठी महायुतीला विजयी करा असे प्रतिपादन क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी केले.
ते भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना शिंदे गट, रिपाई आठवले गट, राष्ट्रीय समाज पार्टी, जनस्वराज्य शक्ती पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारार्थ महायुतीचे शहरातील बुथ कार्यकर्ते व पदाधिकारी तर लोहारा ता.उदगीर
जि.प. देवर्जन सर्कल व जि.प. लोहारा सर्कल अंतर्गत कार्यकत्यांशी संवाद व बैठकीत बोलत होते.
यावेळी माजी आ.गोविंदराव केंद्रे, माजी आ.सुधाकर भालेराव, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, प्रा.श्याम डावळे, रामराव बिरादार,
महिला जिल्हाध्यक्ष उत्तरा कलबुर्गे,
शिवानंद हैबतपुरे, माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, बापूराव राठोड, दिलीप गायकवाड, शिवशंकर धुप्पे, उषा रोडगे, बालाजी भोसले, वसंत पाटील, सुरेंद्र अक्कनगिरे, भाजपाचे शहाराध्यक्ष मनोज पुदाले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, भरत चामले, रामराव बिरादार, नवनाथ गायकवाड, विजय निटुरे, बसवराज रोडगे, बालाजी गवारे, रतिकांत अंबेसंगे, प्रभाकर पाटील, सतिश केंद्रे, वर्षाराणी धावारे, स्वाती वट्टमवार, विकास जाधव, शहाजी पाटील, शफी हाशमी, अनिल मुदाळे, दत्ता पाटील, पप्पु गायकवाड, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना क्रीडा मंत्री संजय बनसोडे हे, विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधान दिले. ते जोपर्यंत सुर्य - चंद्र आहे तोपर्यंत कोणीही बदलु शकणार नाहीत. विरोधकांना निवडणूक आली की संविधान आठवते त्यामुळे ते मुद्दामहून भाजपाच्या विरोधात संविधान बदलतील अशा खोट्या अफवा पसरवत आहेत. देशाला पुढे घेवुन जाण्यासाठी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर आपले विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होवुन प्रत्येक गाव स्मार्ट होईल आणि प्रत्येक व्यक्तीच्या घरात श्रीमंती आल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपण सर्वांनी एकदिलाने काम करुन सुधाकर श्रृंगारे यांना विजयी करावे असे सांगितले.
निवडणुकीत अपप्रचार करुन किंवा जाती धर्मावर बोलुन मत मिळत नाहीत तर ती विकासाच्या मुद्द्यावर मत मिळतात मागील १० वर्षात मोदी सरकारने केलेल्या विकास कामावरच त्यांनी 'सबका साथ, सबका विकास' साद्य केला असल्याने या निवडणुकीत मोदीसरकार ४०० पार करणार असल्याचा विश्वास ना.संजय बनसोडे यांनी व्यक्त केला.
सुत्रसंचलन माजी जि.प. अध्यक्ष रामचंद्र तिरुके व गणेश गायकवाड यांनी केले. यावेळी शहर व ग्रामीण भागातील बुथ प्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments