आजच्या युवकांनी स्वातंत्र्य सेनानीचे आदर्श घेतले पाहिजे - डॉ विजयकुमार पाटील
उदगीर : कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, स्वातंत्र्य सेनानीचा सत्कार व बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी डॉ.विजयकुमार पाटील अध्यक्षीय समारोपात मार्गदर्शन करताना म्हणाले आजच्या युवकांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात योगदान दिलेल्या स्वातंत्र्य सेनानीचे आदर्श घेतले पाहिजे. ध्वजरोहणानंतर कार्यक्रमाची सुरुवात कै. बापुसाहेब पाटील एकंबेकरांच्या प्रतिमा पुजनानी झाली. स्वातंत्र्य सेनानी त्रिंबक शरणाप्पा साकोळकर यांचा सत्कार संस्थेचे सचिव डॉ. विजयकुमार पाटील व सर्व सन्माननीय उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला व उपस्थित सर्व मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला यात संस्थेचे सचिव डॉ. विजयकुमार पाटील कोषाध्यक्ष मृदुलाताई पाटील, प्राजक्ताताई पाटील, प्राचार्य डॉ.ओमप्रकाश क्षीरसागर आकाश मंठाळकर, किशन भिमराव गडदे हे मान्यवर उपस्थित होते. मराठवाडा मुक्ती संग्राम लढा या विषयावर कै.बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर इतिहास विभाग MOUअंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेच्या विजेत्यांचा गौरव स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन करण्यात आला यात प्रथम पारितोषिक शेळके नेहा नारायण, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर, द्वितीय पारितोषिक म्हेत्रे त्रिशरण राजेंद्र महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर, तृतीय पारितोषिक मुंगळे मंजुळा संजय, गायकवाड प्रतीक्षा नागनाथ कै बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय उदगीर,तर उत्तेजनार्थ, मसुरे सौंदर्या संजय श्री हावगी स्वामी महाविद्यालय उदगीर, केंद्रे शुभांगी मोतीराम, मातृभूमी महाविद्यालय उदगीर, बलांडे शुद्धोधन धनाजी, संत तुकाराम विधी महाविद्यालय उदगीर, वाघमारे यादव विजय, शिवाजी महाविद्यालय उदगीर, ससाने श्रुती सुरेश, कै.रामराव पाटील नर्सिंग महाविद्यालय उदगीर, कापसे प्रणिता महादेव,कृषी महाविद्यालय डोंगरशेळकी, सूर्यवंशी अपूर्वा नरसिंग श्री स्वामी समर्थ संगणक महाविद्यालय उदगीर यांना देण्यात आला व प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र देण्यात आले,यानंतर विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी चे कानमंत्र प्राचार्य डॉ ओमप्रकाश क्षीरसागर यांनी दिला प्राजक्ताताई पाटील, मृदुलाताई पाटील, आकाश मंठाळकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ संजय सोमवंशी सूत्रसंचालन प्रा रेखा लोणीकर तर आभार इतिहास विभाग प्रमुख डॉ अनंत शिंदे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली व सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.


Post a Comment