ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

लोणी येथे लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती साजरी

लोणी येथे लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती साजरी

32 तरूणांनी केले रक्तदान.!

उदगीर-  तालुक्यातील लोणी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
       कार्यक्रमाचे उद्घाटन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा उदगीर नगरपालिकेचे नगरसेवक विजय निटुरे यांच्या हस्ते करण्यात आले. विजय निटुरे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जयंती महोत्सव समिती ने मिरवणुकीचा खर्च टाळून समाजपयोगी साहित्य घेण्याचा निर्णय घेतला. व तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती व वैष्णवी महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे.
     यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोणी गावचे सरपंच यमुनाजी भुजबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य शिवकांत मुळे, पांडुरंग केंद्रे, दयानंद पटवारी, बालाजी वाघमारे, जावेद शेख, ज्ञानेश्वर गायकवाड,एकबाल शेख, अशोक मदनुरे , साधुराम कांबळे, उत्तम बिरादार, सुभाष कावर, मारोती भुजबळे, मधुकर मदनुरे, राजकुमार साताळे व इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
      कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप गुलफुले, शाम वाघमारे, राम गायकवाड,प्रकाश गुलफुले, नागनाथ वाघमारे इत्यादींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल वाघमारे यांनी केले. यावेळी नागरिक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


32 तरूणांनी केले रक्तदान.!

   लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती व अंबरखाने ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. रक्तदान श्रेष्ठ दान म्हणत 32 तरूणांनी रक्तदान केले. यावेळी अंबरखाने ब्लड बँकेचे सर्व कर्मचारी यांचे योगदान मोलाचे होते.

Post a Comment

Previous Post Next Post