GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

अर्धारस्ता फुटल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले दिवसाला ५० ते ६० दुचाकीस्वार पडतात घसरुन

देगलुररोडवरील अर्धारस्ता फुटल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले

दिवसाला ५० ते ६० दुचाकीस्वार पडतात घसरुन

उदगीर : येथील देगलूर रोडवरील भांताबे हाॅस्पिटलला जाणाऱ्या मार्गावर श्रीनिवास मेडिकल समोर मुख्य रस्ता अर्धवट फुटल्यामुळे दुचाकीस्वारांचे वारंवार अपघात होत आहेत. दिवसाला ५० ते ६०दुचाकीस्वार पडतात घसरुन पडत असुन यामध्ये महिलांची संख्या ही जास्त असल्याने वाहनधारकातुन तिव्र संताप व्यक्त होत आहे.
रस्तादुरुस्तीचीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चौकशी केली तर तो नॅशनल हायवे आहे. आमच्या विभागाकडे येत नाही असे संबंधित अधिका-यांचे म्हणणे आहे.
वाहनाधारकांना होणारा त्रास हा संबंधीत गुत्तेदार व अधिकाऱ्यांना कळत नाही हीच मोठी शोकांतिका आहे. सदर रस्ता कुठल्याही माध्यमातून का होईना पण दुरूस्त व्हावा हीच वाहनधारकांची ईच्छा असुन याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. सदर रस्त्यावर दिवसेंदिवस अपघात होत असल्याने सुजान नागरिकांतुन तिव्र संताप व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments