ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

खुबा यांची केंद्रीय मंत्रिमंडळात नियुक्तीउदगीर रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने आनंदोत्सव

खुबा यांची केंद्रीय मंत्रिमंडळात नियुक्ती
उदगीर रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने आनंदोत्सव

उदगीर : बिदरचे खासदार भगवंत खुबा यांची केंद्रीय मंत्रिमंडळात नियुक्ती झाल्याबद्दल उदगीर रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने पोलीस स्टेशन समोर फटाके वाजवून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 
यावेळी रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे, माजी नगरसेवक अहमद सरवर, विजय पारसेवार, प्रशांत मांगुळकर, रामदास जळकोटे, अमोल घुमाडे, मदन पाटील, फैयाज शेख, शिवकुमार डोईजोडे, रवींद्र हसरगुंडे, ओम गर्जे, विक्रम हलकीकर, माधव रोडगे, इरफान शेख, अश्फाक शेख, यांची उपस्थिती होती.

उदगीरच्या रेल्वे प्रश्नांना गती मिळणार: मोतीलाल डोईजोडे
भगवंत खुबा हे गेल्या दोन टर्मपासून खासदार म्हणून कार्यरत असून या काळात सीमा भागातील रेल्वे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी सहकार्य केले आहे. खुबा यांच्या मंत्रीमंडळात नियुक्ती झाल्याने आगामी काळात या भागातील रेल्वे प्रश्न अधिक गतीने सुटतील अशी अपेक्षा यावेळी रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post