शिवाजी महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेचा समारोप
उदगीर : येथील शिवाजी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने दि.6ते 10 जुलै 2021 या कालावधीत ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेच्या समारोपीय कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ.अभय दातार यांनी भारतातील निवडणुकांचे राजकारण अभ्यासाच्या नव्या दिशा या विषयावर मार्गदर्शन करताना म्हटले की,लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी निवडणुका निःपक्षपाती व पारदर्शक होणे आवश्यक असते तसेच निवडणुकांच्या राजकारणात केवळ निकाल अभिप्रेत नसून त्याहीपेक्षा विविध घटकांचा अभ्यास केला जातो ही अभ्यासाची नवीन दिशा आहे. आज प्रातिनिधिक नमुना निवड पद्धतीनुसार निवडणुकीच्या विविध घटकांचा अभ्यास केला जात आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव यांनी अध्यक्षीय समारोप करताना म्हटले की, निवडणुकीत कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता निवडणुका पारदर्शक झाल्या तरच लोकशाही बळकट होईल .या व्याख्यानमालेत वेगवेगळ्या विषयावर विचारांची देवाण-घेवाण घडवून आणण्यात आली.त्यात डॉ. अजय गव्हाणे ,डॉ .सुग्रीव फड,डॉ. विठ्ठल दहिफळे ,डॉ. डी. एन. मोरे यांचे विविध विषयावर मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.जगताप ,डॉ.आर .एम. मांजरे यांचेही सहकार्य लाभले. डाॅ. व्ही .डी.गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. तर डॉ.एस.एम कोनाळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रा.व्यंकट बिरादार व महाविद्यालयातील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments