श्रीकांत जाधव भौतिकशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण
उदगीर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने 15 जून रोजी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणाऱ्या सेट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यात महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी तथा मराठवाडा असोसिएशन फॉर स्टुडंट या विद्यार्थी संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्रीकांत बालाजी जाधव(देशमुख) यांनी भौतिकशास्त्र विषयात सेट उत्तीर्ण केले आहे.
तरी त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे आई वडील गुरुजन वर्ग,आप्तेष्ट व मित्रपरिवारांच्या वतीने आनंद व्यक्त करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments