ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

मराठी पत्रकार परिषदेच्या विभागीय सचिवांच्या नियुक्त्या जाहीर

मराठी पत्रकार परिषदेच्या विभागीय सचिवांच्या नियुक्त्या जाहीर

विभागीय सचिव हे परिषदेचे कान व डोळे- एस.एम. देशमुख

पुणे : मराठी पत्रकार परिषदेच्या कोअर कमिटीच्या काल पुण्यात झालेल्या बैठकीत परिषदेच्या विभागीय सचिवांच्या नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.. विभागीय सचिवांच्या नियुक्त्या करताना तरूणांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.. मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.. बैठकीस विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे, मावळते विभागीय सचिव गणेश मोकाशी उपस्थित होते.. प्रारंभी पिंपरी चिंचवड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले आणि टीमने परिषदेच्या पदाधिकारयांचे स्वागत केले..

मराठी पत्रकार परिषदेच्या संघटनात्मक रचनेत विभागीय सचिवांना विशेष महत्व आहे.. आपल्या विभागात संघटनेचं काम वाढविण्याबरोबरच विभागातील जिल्हे, तालुका पत्रकार संघांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्याचं काम ही व्यवस्था करते..परिषदेच्या उपक्रमांची आपल्या विभागात अंमलबजावणी करण्याचं काम विभागीय सचिव पार पाडतात.. थोडक्यात विभागीय सचिव हे परिषदेचे कान व डोळे म्हणून कार्यरत असतात. नवे विभागीय सचिव पुढील प्रमाणे- 1) मुंबई विभाग : दीपक कैतके, मुंबई फेरनियुक्ती , 2) पुणे विभाग : पी . पी. कुळकर्णी, सोलापूर, 3) संभाजीनगर विभाग : रवी उबाळे, बीड, 4) नागपूर विभाग : प्रदीप घुमटवार, नागपूर , 5)अमरावती विभाग : शिखरचंद हुकूमचंद बागरेचा, वाशिम, 6) कोकण विभाग : मनोज खांबे, महाड, 7) लातूर विभाग : सचिन शिवशेट्टे उदगीर, फेरनियुक्ती , 8) नाशिक विभाग : अमोल खरे, मनमाड, 9) कोल्हापूर विभाग :चंद्रकांत क्षीरसागर, सांगली.  मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी सर्व नवनियुक्त विभागीय सचिवांचे अभिनंदन केलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post