ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

सामान्य माणसाला जगण्याचा हक्क बाबासाहेबांनी दिला : प्रा.अनिल मगर

सामान्य माणसाला जगण्याचा हक्क बाबासाहेबांनी दिला : प्रा.अनिल मगर 

वाढवणा : भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि देश जोखडातून मुक्त झाला असला तरी सामान्य माणसाला जगण्याचा खरा हक्क डॉ.बाबासाहेबांनी दिला. असे मत इतिहास विभाग प्रमुख प्रा. अनिल मगर यांनी व्यक्त केले. ते महापरिनिर्वाण दिनानिमित्त बोलत होते. वाढवणा येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम करण्यात आला. यावेळी संभाजी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आमगे एस.यु.उपस्थित होते. बाबासाहेबांचे विचार हे कायद्याच्या माध्यमातून आजही लोकशाहीत नांदत असून त्यानी दिलेले समतेचे मुल्य टिकविणे आजच्या पिढीला मोठे आव्हान ठरणारे आहे असे आमगे एस.यु. म्हणाले. यावेळी मुलांनी बाबासाहेबांचा जीवन प्रवास आपल्या मनोगतातून उलगडून दाखवला. यावेळी रामदास केदार, दहिफळे एस.पी., प्राचार्य मुंजेवार वाय.के.,मुधाळे डी.जी, पठाण आर. एस, मुळे एम. ए, इंद्राळे एम. एम, केंद्रे व्ही जी, कांबळे एन. एस, रोंगे एन.आर , हाळणे एस एस, नागरगोजे जी. बी., नागरगोजे वैशाली उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post