ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

उदयगिरीत " देश का प्रकृती परीक्षण" अभियान आरोग्य तपासणी अप्लीकेशनविषयी माहिती शिबिर

उदयगिरीत " देश का प्रकृती परीक्षण" अभियान आरोग्य तपासणी अप्लीकेशनविषयी माहिती शिबिर

उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती उदगीर व धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालय, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने " देश का प्रकृती परीक्षण" अभियाना अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी बनवलेल्या विशेष एप्लीकेशनची माहिती देण्याविषयीच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव म.ए. सोसायटी उदगीर हे होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक धन्वंतरीचे प्राचार्य दत्तात्रय पाटील यांनी प्राध्यापक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आयुर्वेद ही मानवी जीवनशैली बनली पाहिजे असे मत व्यक्त केले. प्रमुख उपस्थिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कोषाध्यक्ष प्राचार्य विजयकुमार पाटील, बाबुराव माशाळकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य  राजकुमार मस्के यांनी मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. बी. एस. भुक्‍तरे  यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. बालाजी होकरणे त्यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post