ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब सुर्यवंशी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब सुर्यवंशी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित 

छ. संभाजीनगर : उदगीर येथील सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब सुर्यवंशी यांना मराठवाडा स्तरीय समाजरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले दि. २८ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार वितरित करण्यात आला.
राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीतर्फे छ. संभाजीनगर येथील मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी घाटी शासकिय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून छ. संभाजीनगर चे सहाय्यक पोलीस उपायुक्त नवीन कुमावत, राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीचे अध्यक्ष सय्यद साबेर सय्यद सरदार, सचिव अखिल अहमद रामपूरे, उपाध्यक्ष शेख शरीफ आहेमद, बंडू पुरुषोत्तम बच्चव व प्रसिध्द गोल्डन मॅन मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समिती दरवर्षी  सामाजीक क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यास 'समाजरत्न पुरस्कार' देवून गौरव करण्यात येतो. सन २०२३- २४ साठी संस्थेच्या वतीने उदगीर येथील सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब सुर्यवंशी यांना प्रदान करण्यात आला आहे. बाबासाहेब सुर्यवंशी यांना मिळालेल्या पुरस्कार बद्दल सर्वस्तरातून अभिनंदन व शुभेच्छांवर्षाव होत आहे. त्यांना मिळालेल्या  समाजरत्न पुरस्कार बद्दल सुनील गोडबोले, मारोती तलवाडकर,  मनोहर गायकवाड, माजी नगरसेवक शेख फय्याज, संग्राम गडकर, प्रा. कैलास कांबळे, दत्ता भोसले, उत्तम पकोळे, शिवाजी पकोळे, रत्नदीप बलांडे, सुनील पकोळे आदींनी अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post