GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

ब्राईट स्टार हायस्कूलचे दहावी परिक्षेत घवघवीत यश

ब्राईट स्टार हायस्कूलचे दहावी परिक्षेत घवघवीत यश

सिद्दिकी फैजान शफिउद्दिन 98.40% गुण घेऊन प्रथम
उदगीर : गुणवत्तापूर्ण शिक्षण व दहावी बोर्ड परिक्षेतील यशाची परंपरा कायम ठेवत शाळेचा निकाल प्रतीवर्षाप्रमाणे 100% लागला असून विद्यार्थ्यांनी 100% गुण घेऊन शाळेच्या उज्वल परंपरेत मानाचा तुरा रोवला आहे. उदगीरच्या शैक्षणिक पटलावर ब्राईट स्टार हायस्कूलचे नाव सुवर्णाक्षरात रेखले आहे. गतवर्षीही ब्राईटस्टार हायस्कूलच्या कु. इफ्रा शेख व कु पुनम स्वामी यांनी 100% गुण प्राप्त करून जिल्ह्यात प्रथम स्थान मिळविले होते.सध्याच्या स्पर्धात्मक युगात,ब्राईट स्टार हायस्कूल समाजातील सर्व स्तरांतून सर्व परिपूर्ण,मेहनतीने यशवंत विद्यार्थी घडवित आहे. 30 पैकी 90% पेक्षा जास्त गुण घेणारे 12 विद्यार्थी, डिस्टिंक्शन 24 ,प्रथम श्रेणीत गुण घेणारे 5  विद्यार्थी , असा शाळेचा 100% निकाल लागला आहे तर 
सिद्दिकी फैजान शफिउद्दिन 98%, जाधव प्रणव 96.20%, सिद्दिकी फैजान साजीद 95.40, शेख रियान 94.80%, बिरादार वैभव 94.80%, बडिहवेली तृप्ती 94.60%, बिरादार अक्षरा 93.80%, जाधव यश 93.80%, गर्जे श्रेया 93%, बिरादार वैष्णवी 92.60%, पाटिल अमेय 91.20%, सुर्यवंशी सलोनी 90.80%, या सर्व विद्यार्थ्यी ,पालक व शिक्षकांचे शाळेचे प्राचार्य विरभद्रजी घाळे, प्राचार्या सौ. प्रेमा घाळे, डॉ. भाग्यश्री घाळे, प्रा. अजिंक्य घाळे, प्रा. ऋतुजा घाळे यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments