ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उदगीर शहर अध्यक्ष पदी सय्यद जानीमियाँ तर कार्याध्यक्षपदी शशिकांत बनसोडे यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उदगीर शहर अध्यक्ष पदी सय्यद जानीमियाँ तर कार्याध्यक्षपदी शशिकांत बनसोडे यांची निवड

उदगीर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या मान्यतेने , महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री  ना. संजय बनसोडे, आमदार बाबासाहेब पाटील, छ. संभाजी नगर शिक्षक मतदार संघाचे आ. विक्रम काळे , अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष इद्रिसभाई नायकवडी,  प्रदेश कार्याध्यक्ष वसिमभाई बुर्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  सूरज चव्हाण ,  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस व्यंकट बेद्रे ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर जिल्हाध्यक्ष अफसर बाबा शेख यांच्या आदेशाने उदगीर शहरातील युवा कार्यकर्ते सय्यद जानीमियाँ यांची उदगीर शहराध्यक्षपदी तर शशिकांत बनसोडे यांची कार्याध्यपदी   नियुक्ती करण्यात आली आहे.

 त्यांना महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री  ना.संजय बनसोडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष फैजुखाँ पठाण, जिल्हा सरचिटणीस फय्याज शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उदगीर तालुकाध्यक्ष बालाजी भोसले पाटील, उदगीर - जळकोट विधानसभा अध्यक्ष प्रवीण भोळे, तालुका कार्याध्यक्ष वसंत पाटील, जळकोटचे तालुकाध्यक्ष संग्राम हासुळे पाटील, जळकोटचे कार्याध्यक्ष पाशा शेख, इब्राहिम पटेल, पाशा मिर्झा बेग, अक्रम जहागिरदार, विनोद गुरमे, सतिश कांबळे, सय्यद बब्बर शेळकीकर, रावसाहेब भालेराव आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post