ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

हरित सेनेच्या वतीने वृक्षांना बिसलेरीच्या बाटली अडकून ठिबकने पाणी

हरित सेनेच्या वतीने वृक्षांना बिसलेरीच्या बाटली अडकून ठिबकने पाणी

एकर्का रोड येथील समर्थ विद्यालयाचा उपक्रम
उदगीर : उन्हाळ्याची चाहूल लागताच झाडांना जगविण्यासाठी  तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी धडपड सुरू झाली असून हरित सेनेच्या वतीने वृक्षांना बिसलेरीच्या बाटली अडकून ठिबकने पाणी देण्यात येत आहे. 
पर्यावरण जाणीव जागृती करणारी शाळा म्हणून समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा नावलौकिक आहे. शाळेच्या प्रांगणात जवळपास पाचशे च्या वर विविध जातीची देतो झाडे आहेत. यावर्षी पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने जानेवारी महिन्यापासूनच मोठी झाडे सुध्दा रूक्ष झाली आहे. कांही झाडे सुटण्याच्या मार्गावर आहेत.  ही बाब येथील हरित सेनेच्या विद्यार्थ्यांना लक्षात येताच जानेवारी महिन्यापासून झाडांना बिसलेरीच्या बाटल्या अडकवून ठिबक पध्दतीने नियमित पाणी देत आहेत. यामुळे झाडांना नवीन पालवी फुटली आहे. यासाठी संस्थासचिव प्राचार्य प्रमोद चौधरी, पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके, संस्थासदस्य प्रा. एम. व्ही. स्वामी, प्रा. बी. एस. बाबळसूरे हरित सेनेचे मार्गदर्शक शिक्षक प्रदीप केंद्रे, सचिन तेलंग याच्यासह हरित सेनेचे विद्यार्थी पुढाकार घेत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post