ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

स्नेहसंमेलनातून समाज प्रबोधनाचा जागर

स्नेहसंमेलनातून समाज प्रबोधनाचा जागर
सत्यशोधक पर्यावरण विकास विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

उदगीर : तालुक्यातील हकनकवाडी येथील सत्यशोधक पर्यावरण विकास विद्यालयात शनिवारी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विशेष म्हणजे स्नेहसंमेलनातून समाज प्रबोधनाचा जागर घालण्यात आला. 
 अध्यक्षस्थानी संस्था सचिव प्राचार्य प्रमोद चौधरी उपस्थित होते. उद्घाटक म्हणून तोंडार येथील ओमसाई सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शिवकुमार पांडे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून समर्थ विद्यालयाचे पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके, संस्थासदस्य प्रा. एम. व्ही. स्वामी, सहसचिव प्रणयन चौधरी,विरभद्र बिरादार, संदीप बिरादार, मष्णाजी सुरनर, डोंगरशेळकीचे माजी सरपंच ज्ञानोबा मुंढे, मुख्याध्यापक चंद्रपाल पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी सरस्वती व स्व. व्यंकटेश चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. इयत्ता पाचवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक गाण्यांवर बहारदार नृत्य सादर करून रसिक श्रोत्यांची मने जिंकली. समाजप्रबोधन पर अनेक देखावे व पर्यावरणाची नाटिका सादर करण्यात आली. प्रास्ताविक मुख्याध्यापक चंद्रपाल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन रसूल पठाण, अमर जाधव यांनी केले. तर आभार संतोष कांबळे यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post