ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

मराठवाडास्तरीय आंतरशालेय वादविवाद स्पर्धेच्या ढाल विजयाचा मानकरी ठरला किशन सोमानी विद्यालयाचा संघ

मराठवाडास्तरीय आंतरशालेय वादविवाद स्पर्धेच्या ढाल विजयाचा मानकरी ठरला किशन सोमानी विद्यालयाचा संघ

कुंथलगीरीच्या श्री देशभूषण कुलभूषण विद्यालयाचा संघ उपविजेता

     उदगीर : मराठवाड्यातील सुप्रसिद्ध व ऐतिहासिक स्व.लालबहादुर शास्त्री यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या   मराठवाडास्तरीय आंतरशालेय वादविवाद स्पर्धेचे ४४ वे वर्ष आहे. एकूण ३९ संघातील ७७ स्पर्धकांनी सहभाग घेतला.दोन दिवस चालणाऱ्या स्पर्धेच्या समारोप सत्राची सुरुवात भारत माता,छत्रपती शिवाजी महाराज, लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी मंचावर अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून अविनाश देवशटवार (प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण, लातुर),प्रशांत इरकर (कामगार कल्याण आयुक्त, सोलापुर),विद्याभारती देवगिरी प्रांताचे उपाध्यक्ष नितीन शेटे,पूर्व सहकार्यवाह प्रा.चंद्रकांत मुळे, रा.स्व. संघाचे जिल्हा कार्यवाह रविंद्र जाधव,प्रदीप पेन्सलवार ,परीक्षक डॉ.मकरंद गिरी,प्रा.अरूण धायगुडे व प्रा.अरविंद मुळे, स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा  स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह शंकरराव लासुणे, माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष सतनप्पा हुरदळे, प्राथमिक शालेय समितीचे अध्यक्ष व्यंकटेश गुरमे, रामकृष्ण सीबीएसई स्कूलचे अध्यक्ष डॉ. प्रशांत राजुरकर, स्वामी विवेकानंद वसतीगृहाचे अध्यक्ष षणमुखानंद मठपती, स्थानिक समन्वय समितीचे सदस्य संतोष कुलकर्णी,बालवाडी विभागाच्या अध्यक्षा अंजलीताई नळगीरकर,अर्थ समितीचे अध्यक्ष ऍड.शिवाजी बिराजदार, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अंबादास गायकवाड,प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे, सीबीएसई स्कूलचे प्राचार्य श्रीपाद सीमंतकर हे उपस्थित होते.
      
    परीक्षकांच्या मनोगतात बोलताना परीक्षक अरुण धायगुडे म्हणाले की,संस्था संस्कारक्षम आहे.कार्यक्रमाचे उच्च नियोजन केलेले होते. शिक्षकांनी समर्पित भावनेने कार्य केले.परीक्षण करताना तारेवरची कसरत करावी लागली. वक्तृत्व कसे असावे याचेही मार्गदर्शन केले. 
प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनात अविनाश देवशटवार - एका कथेच्या माध्यमातून प्रामाणिकपणाचे महत्व सांगितले.
प्रशांत इरकर यांनी त्यांच्या यशामध्ये शाळेचे असलेले योगदान सांगितले.
नितीन शेटे यांनी स्पर्धेच्या विषयामुळे संयोजन समितीचे अभिनंदन केले व नवीन शैक्षणिक धोरणाविषयी मार्गदर्शन करताना हे धोरण भा.शि.प्र.संस्थेच्या विचारधारेला पुढे घेऊन जाणारे असल्याचे सांगितले. सामाजिक शिक्षणाची संकल्पने विषयी बोलतांना त्यांनी शिक्षक व पालक यांना विद्यार्थी घडवतांना उपयुक्त असे मार्गदर्शन केले. मंगेश झोले यांनी शुभेच्छा संदेश पाठवून उपस्थित स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
    अध्यक्षीय समारोपात डॉ.हेमंत वैद्य म्हणाले," भारतीय समाजात शिक्षणाचा अभाव आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाला सुद्धा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. निश्चितच स्पर्धेसाठी घेतलेल्या विषयाने निश्चितच फायदा होईल. अपयश पचवण्याची तयारी असावी. स्पर्धा जरूर असावी, पण त्यात संवेदना असावी. बक्षीस मिळेल न मिळेल पण त्यात भाग घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे." स्पर्धेच्या विषयाची उंची वाढविल्याबद्दल विद्यालयाचे कौतुकही केले.
     या मराठवाडास्तरीय आंतरशालेय वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे ढाल आणि ११ हजार रुपये पारितोषिकाचे मानकरी ठरले आहेश्री.किशन सोमानी विद्यालयाचा संघ तर द्वितीय क्रमांकाचे ८००० रुपये पारितोषकाचे मानकरी ठरले आहे कुंथलगीरीच्या श्री देशभूषण कुलभूषण विद्यालयाचा संघ उपविजेता ठरला आहे.

तृतीय स्वामी विवेकानंद विद्यालय चापोली , सर्व चतुर्थ संघ बाल विद्यामंदिर हायस्कूल परभणी सर्व पंचम संघ महात्मा गांधी विद्यालय केसरजवळा हे मानकरी ठरले आहेत.ग्रामीण मुलीत प्रथम आकांक्षा बलशेटवार , द्वितीय प्रतिक्षा पाटील,तृतीय रुकीया शेख,चौथी भाग्यश्री चव्हाण पाचवे बक्षीस विभागून रोहिणी माळी व जान्हवी कर्डीले यांनी प्राप्त केले.ग्रामीण मुलात सर्वप्रथम तन्मय  जैन, द्वितीय अभिजीत लोखंडे ,तृतीय कृष्णा सोनवणे, चौथा वैभव साखरे,पाचवा अनिकेत काळे,शहरी मुलीत मधुरा  तेलंगे द्वितीय गायत्री शेरीकर तृतीय संस्कृती पिसाळ चौथी पुष्पा डोणगावे,पाचवी संस्कृती पाटील, शहरी मुलात प्रथम काझी नजीमोदिन, द्वितीय दिनकर बिरादार, तृतीय यश डाके,चौथा यश चौधरी,पाचवा अजिंक्य गायकवाड हे विजयी झाले आहेत
 या स्पर्धेचे सूत्रसंचालन आशा गौतम यांनी केले तर स्पर्धेचे अहवाल वाचन स्पर्धा प्रमुख सचिन यतोंडे, सांघिक पद्य मुकुंद मिरगे,स्वागत व परिचय अनिता मुळखेडे, निकाल वाचन व बक्षीस वितरण निता मोरे, वैयक्तिक गीत प्रिती शेंडे,आभार माधव मठवाले तर कल्याण मंत्र प्राजक्ता जोशी यांनी सांगितला.  याकार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post