खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रयत्नाने लातूरसाठी रेल्वे मंत्रालयाकडून पिट लाईनच्या मंजुरीसह 27.70 कोटी रुपयाचा निधी मंजूर
लोकसभा मतदार संघात शेकडो कोटींची कामे केली : खासदार सुधाकर शृंगारे
लातुर : लोकसभा मतदारसंघातील मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रेल्वेच्या पिट लाईन मंजुरीबाबत मी करत असलेल्या केंद्रीय मत्री महोदयांच्या आणि लोकसभेत प्रश्न स्वरूपाच्या पाठपुराव्यास यश आले असून सदर कामांना मंजुरी प्राप्त झाली आहे. आजपर्यंत आपण लातूर लोकसभा मतदार संघात शेकडो कोटींची कामे केली असल्याचे ही खा.श्रृंगारे यांनी सांगितले.
माझ्या कार्यकाळात व मागील अनेक वर्षांच्या अविरत पाठपुराव्यानुसार दि. 5 जानेवारी 2024 रोजी या कामांना मंजुरी मिळाली असून यासाठी 27.70 कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध झाला आहे. यामुळे मतदारसंघातील रेल्वेची संख्या वाढवणे, रेल्वे थांब्याच्या मागण्या, अत्याधुनिक यंत्रणेद्वारे रेल्वेचे संचालन, सुसूत्रीकरण आदी बाबी आता उपलब्ध होणार आहेत.
यामधून स्टेबलिंग लाईन मंजूर झाल्यामुळे वॉशिंग, सर्व्हिसिंग, इंजन सर्व्हिसिंग, आदी सोयी उपलब्ध होणार आहेत. ज्यामुळे नवीन रेल्वे सुरु होतील आणि इतर चालू असलेल्या रेल्वे लातूर मध्ये येणार आहेत.
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री आ. अमितजी शहा, केंद्रीय रेल्वेमंत्री मा. श्री. अश्विनीजी वैष्णव, रेल्वे राज्य मंत्री आ. श्री. रावसाहेब दानवे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजितजी पवार, भारतीय रेल्वे बोर्डच्या अध्यक्ष सौ. जया वर्मा सिन्हा आणि संचालक मंडळ यांच्यासह मला या कामासाठी सहकार्य केलेले पदाधिकारी व अधिकारी यांचे खा.सुधाकर श्रृंगारे यांनी आभार व्यक्त केले आहेत.


Post a Comment