ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

सिद्धी शुगर परिसरातील नागरिकांसाठी मोफत सर्व रोगनिदान व औषधोपचार तथा रक्त शर्करा (ब्लड शुगर) तपासणी शिबिर

सिद्धी शुगर परिसरातील शेतकरी,अधिकारी,कर्मचारी,तोडणी वाहतूक कॉन्ट्रॅक्टर,मजूर व नागरिकांसाठी मोफत सर्व रोगनिदान व औषधोपचार तथा रक्त शर्करा(ब्लड शुगर)तपासणी शिबिर

उदगीर : माजी मंत्री बाळासाहेब जाधव(अध्यक्ष,बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ,अहमदपूर)यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार,दि.१० डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ०४.३० या दरम्यान सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड,महेश‌ नगर,उजना,अहमदपूर येथे धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर व सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी,अधिकारी,कर्मचारी,तोडणी वाहतूक कॉन्ट्रॅक्टर,मजूर व नागरिकांसाठी मोफत सर्व रोगनिदान व औषधोपचार तथा नि:शुल्क रक्त शर्करा(ब्लड शुगर)तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
सदरील शिबिरामध्ये वातविकार,आम्लपित्त,मधुमेह,मुळव्याध,त्वचाविकार,लठ्ठपणा,हर्निया,हायड्रोसिल,नेत्ररोग,दंतरोग,श्‍वसनविकार,पोटाचे विकार,लहान बालकांचे आजार,श्वेतप्रदर,रक्तप्रदर व स्त्रीयांचे विकार-मासिकपाळी समस्या इत्यादी आजारांच्या रुग्णांवर आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार करण्यात येणार आहे.
सदरील शिबिराच्या अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब पाटील,व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव,संचालक सुरज पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
तरी या मोफत शिबिराचा रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ.दत्तात्रय वि.पाटील,व्हाईस प्रेसिडेंट पी.जी.होनराव,डॉ.मंगेश मुंढे,डॉ.उषा काळे, जनरल मॅनेजर एस.आर.पिसाळ,जनरल मॅनेजर(केन)पी.एल.मिटकर,ऊस विकास अधिकारी वाय.आर.टाळे आणि तसेच धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल कॉलेज,उदगीर व सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड चे सर्व कर्मचारी यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post