ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

सर्वसामान्य माणसाला मदत करणे हेच माझे ध्येय : शिवकुमार पांडे

सर्वसामान्य माणसाला मदत करणे हेच माझे ध्येय : शिवकुमार पांडे

शिवकुमार पांडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिलाई मशिन व शालेय साहित्याचे वाटप
उदगीर : तालुक्यातील तोंडार येथील युवा उद्योजक तथा  ओम साई सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवकुमार पांडे यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील होतकरु महिलांना ज्यांना शिवणकाम करण्याची आवड आहे अशा महिलांना त्यांच्या स्वखर्चातून 50% व ओम साई सेवाभावी संस्था,तोंडार यांच्या 50% आर्थिक सहकार्याने एकूण 65 शिलाई मशीन व पिको फॉल मशीनचे वाटप करण्यात आले तर गावातील नेहरू मेमोरियल हायस्कूल, जिल्हा परिषद शाळा व विद्याशिल्प इंग्लिश स्कूल, तोंडार या आदी शाळेतील विद्यार्थींना वह्या व पेन व खाऊचे वाटप करण्यात आले. त्यानंतर गावातील मुस्लिम स्मशान भूमी येथे फळांची झाडे लावून वृक्षारोपण करुन पांडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. शिल्पाताई शिवकुमार पांडे, तोंडारच्या उपसरपंच सौ.प्रयागताई शिवलिंग नावंदे,ओम साई संस्थेच्या सचिव सौ. सुवर्णाताई खिंडे, ओम साई महिला मंडळाचे सदस्य मनीषा बिरादार, रेखा बिरादार, प्रियंका बिरादार, लता स्वामी, ग्रामपंचायत सदस्या मंगला बिरादार, पद्मिनबाई पांडे, निर्मलाबाई लासुरे, छायाबाई कांबळे यांच्यासह गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना ओम साई सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवकुमार पांडे यांनी वाढदिवस हे फक्त निमित्त आहे. मात्र समाजातील गरजू लोकांना मदत करुन त्या रोजगार उपलब्ध करुन देण्याचा माझा प्रयत्न असुन  सर्वसामान्य माणसाला मदत करणे हेच माझे ध्येय आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक गोरगरीब महिला व गरजू विद्यार्थांना मदत करता आली याचे समाधान असुन भविष्यात ही संस्थेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना मदत करण्याचे काम मी करणार असल्याचे शिवकुमार पांडे यांनी जनस्तंभ न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post