ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या नवनिर्वाचित कार्यकारी संचालकांचा विद्यावर्धिनी हायस्कूलमध्ये सत्कार

किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या नवनिर्वाचित कार्यकारी संचालकांचा विद्यावर्धिनी हायस्कूलमध्ये सत्कार 


कै.अशोकराव बापूसाहेब पाटील एकंबेकर यांची पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

उदगीर  : येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक धर्मदाय कार्यालय लातूर यांच्याकडून दि. २६ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिन जांबुतकर यांनी काम पाहिले. यावेळी झालेल्या निवडणूकीत पृथ्वीराज पाटील व अजित पाटील गटाचे नऊपैकी नऊ संचालक निवडून आले.

अध्यक्षपदी श्रीरंगराव पाटील एकंबेकर, उपाध्यक्ष माधवराव पाटील, सचिवपदी पांडुरंग शिंदे, सहसचिव हिरागीर सिद्धगीर, कोषाध्यक्ष गुंडेराव पाटील तर सदस्य म्हणून ज्ञानदेव झोडगे, रामराव एकंबे, काकासाहेब पाटील सास्तुरकर, भीमराव पाटील पाटोदकर यांची निवड झाली. या नुतन कार्यकारणी संचालक मंडळाचा सत्कार समारंभ व कै. अशोकराव बापूसाहेब पाटील एकंबेकर यांचे सहावे पुण्यस्मरण दि. २८ नोव्हेंबर रोजी विद्यावर्धिनी हायस्कूलमध्ये पार पडले.

या प्रसंगी भगवानराव पाटील तळेगावकर, अरुण बापूसाहेब पाटील एकंबेकर, प्रकाश पाटील एकंबेकर, राहुल पाटील सास्तुरकर, सुदर्शन पाटील तोंडचीरकर, पुंडलिक पाटील पाटोदकर, बाबासाहेब गुंडेराव पाटील, महेश हिरागीर दस्तगीर, गोविंदराव जानतेने, मनोज कनाडे, रामभाऊ हाडोळे, विजयकुमार पाटील गणेशपुरकर, आसिफ तांबोळी , आदी मोठ्या उपस्थित होते.

यावेळी किसान शिक्षण प्रसारक मंडळच्या निवडणुकीची धुरा सांभाळणारे अजित पाटील तोंडचिरकर व पृथ्वीराज पाटील एकंबेकर, भगवानराव पाटील तळेगावकर, विजयकुमार पाटील गणेशपुरकर, राहुल पाटील सास्तुरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील यांच्या वतीने अरुण बापूसाहेब पाटील एकंबेकर यांनी मानले. आपल्या मनोगतात कै.अशोकराव पाटील एकंबेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला व व नवीन कार्यकारी मंडळास पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान बिरादार व आभार एम. एस. जाधव यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post